शिमोगा : कर्नाटकमधील शिवमोगा ( Shivamogga) जिल्ह्यातील हुणुसगोडमध्ये 50 बॉक्स जिलेटीन कांड्याचा मोठा स्फोट (Blast in Shivamogga) झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भूकंप (earthquake) सदृश्य धक्के जाणवले. या स्फोटात तब्बल 8 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर जिल्ह्यातील अनेक भागातील वीज देखील गायब झाली आहे. हुणुसगोडमध्ये क्रशरसाठी एका ट्रकमध्ये 50 बॉक्स जिलेटीन च्या पेट्या ठेवल्या होत्या. या सर्व जिलेटीन कांड्याचा एकाच वेळी स्फोट झाल्याची माहिती आहे.
शिमोगा जिलेटीन कांड्यांचा मोठा धमाका झाला. आसपासच्या भागात भूकंपाप्रमाणे अनुभव आला. जिलेटिन कांड्यांच्यामाध्यमातून दगड तोडकाम सुरु होते. रात्री साडे दहा वाजता हा मोठा स्फोट झाला होता. शिमोगाबरोबर चिकनमंगलुरू आणि दावणगेरे येथेही मोठे धक्के जाणवले, अशी माहिती काहींनी दिली. या स्फोटात 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
At least 6 dead after major explosion of truckload of explosives, suspected to be meant for mining, in Karnataka's #Shivamogga district: police
— Press Trust of India (@PTI_News) January 21, 2021
उपस्थितांनी सांगितले की, स्फोट शक्तीशाली होती. या स्फोटामुळे घरांचे मोठे नुकसान झाले. घरांच्या खिडक्यांना जास्त धोका पोहोचला. लोकांना वाटले की, जोरदार हादरे बसल्याने भूकंप झाल्याचे वाटले. काही लोकांना भूकंप मापन केंद्रीशीही संपर्कही साधला.
खान कामासाठी जिलेटीन कांड्या आणल्या असाव्यात अशी माहिती आहे. कारण एका ट्रॅकमध्ये या कांड्या होत्या आणि त्याचा मोठा स्फोट झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एक पोलीस अधिकारी म्हणाला, भूकंप झाला नाही. पण शिमोगाच्या बाह्य भागात ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत हंसूरमध्ये स्फोट झाला. एक अन्य पोलिस अधिकारी म्हणाले, “जिलेटिन ले ट्रॅकमध्ये धमाका झाला. ट्रॅक मध्ये राहात मजकूरांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी सांगितले की, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.