नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेवर काल झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर ए तोएबाचा दहशतवादी इस्माईल असल्याचं आयबीच्या सूत्रांच म्हणणं आहे. इस्माईल हा पाकिस्तानी दहशतवादी आहे, काही दिवसांपासुन लष्कर ए तोएबाच्या स्लीपर सेलमध्ये होता. त्यानचं या हल्लाचा कट रचून अंमलात आणला अशी माहिती पुढे येते आहे.
काल इस्माईलसह एकूण पाच दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला. त्यापैकी दोघे लष्करचे पाकिस्तानमधले तर दोघे स्थानिक तरुण होते. या सर्वांनी गोळीबार करून सात भाविकांचे प्राण घेतल्याचं आता पुढे येतं आहे.