अखेर तिच्यातली आई झाली जागी; हिंस्र बिबट्यावर पडली भारी : VIDEO

सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

Updated: Aug 11, 2021, 08:53 AM IST
अखेर तिच्यातली आई झाली जागी; हिंस्र बिबट्यावर पडली भारी : VIDEO  title=

मुंबई : बिबट्या सारखा हिंस्र प्राण्याचा जंगलात एक वेगळाच दबदबा असतो. जेव्हा बिबट्या जंगलात शिकार करतो तेव्हा त्याचे भक्ष्य किंवा इतर प्राण्यांचं वाचणं कठी असतं. कारण बिबटयाच्या शिकारीचा अनुभव इतका खतरनाक असतो की, त्या भक्ष्याला देखील आपण शिकार होतोय हे देखील कळत नाही. मात्र कायमच ठरल्याप्रमाणे होतंच असं नाही. या व्हिडीओत चक्क एका बिबट्यावर डुक्कर भारी पडलं आहे. 

'जगात भारी आपली आई' असंच काहीस या भक्ष्य झालेल्या पिल्लाला वाटत असेल. हा व्हिडीओ @naturesgnarly या ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत एका बिबट्याने डुक्कराच्या पिल्लाची शिकार केली. आपल्या जबड्यात शिकार घेऊन तेथून पळ काढणाऱ्या बिबट्याचा पाठलाग त्या शिकार झालेल्या पिल्लाच्या आईने म्हणजे डुकराने केला. 

आईचं ते रौद्र रूप बिबट्यावर भारी पडलं. बिबट्याने तेथून पळ काढताना जबड्यातील शिकार खाली टाकलं आणि तो तेथून पळून गेला. हा संपूर्ण प्रकार एका पर्यटकाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडीओला सर्वाधिक पसंती मिळत आहे. 

व्हिडीओत बिबट्या एका छोट्या डुक्कराच्या पिल्लाची शिकार करतो. मात्र पुढे जाऊन बिबट्या पिल्लाला सोडून देतो. कारण त्या पिल्लाची आई जंगली डुक्करीन त्या बिबट्यावर अटॅक करते. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 'बेस्ट आई' अशी कमेंट करत हा व्हिडीओ शेअर करत आहेत.