तुमची LIC Policy आहे का? 24 मार्च तारीख लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान

LIC Policy Latest News : भारतीय आयुर्विमा निमगने पॉलिसीधारकांसाठी मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. जर तुम्ही एलआयसी पॉलिसी घेतली असेल आणि तुमचा प्रीमियम भरण्यास विसरला असेल, तर आता तुम्हाला ती पुन्हा सुरु करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्यावतीने ग्राहकांना त्यांची पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची सुविधा दिली जाणार आहे.

Updated: Feb 22, 2023, 03:29 PM IST
तुमची LIC Policy आहे का? 24 मार्च तारीख लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान  title=
LIC Policy News

LIC Special Revival Campaign : विमा पॉलिसी असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. LIC पॉलिसी धारकांकडे खास एक सुविधा सुरु करत आहे. त्यामुळे बंद पडलेली तुमची पॉलिसी पुन्हा नव्याने सुरु करता येणार आहे. LIC पॉलिसी घेतली असेल आणि तुमचा प्रीमियम भरण्यास विसरला असेल, तर आता तुम्हाला ती पुन्हा सुरु करण्याची संधी मिळणार आहे. तसेच तुम्हाला विलंब शुल्कातही मोठी सूट दिली जात आहे. यासाठी तुम्हाला 24 मार्चपर्यंत संधी आहे. त्यामुळे ही तारीख विसरु नका.

सध्या देशभरात LIC चे करोडो ग्राहक आहेत. अनेकवेळा असे दिसून आले आहे की, काहीवेळा पॉलिसीचा प्रीमियम भरण्याचे ग्राहक विसरतो आणि शेवटची तारीख संपल्यानंतर ते लक्षात येते. तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. आता तुम्हाला चुकलेला हप्ता भरता येणार आहे.

तुमची पॉलिसी बंद पडणार नाही तर पुन्हा सुरु करता येणार?

तुमचा हप्ता चुकला असेल तर खाबरुन जाऊ नका. कारण तुमची विमा पॉलिसी बंद पडणार नाही. ती पुन्हा सुरु करता येणार आहे. पॉलिसी फक्त 5 वर्षांच्या आत रिव्हाइव्ह करु शकता. पॉलिसीधारक युलिप आणि उच्च जोखमीच्या पॉलिसी पुन्हा सुरु करु शकत नाहीत. रि-ओपनिंगसाठी त्यात अर्ज द्यावा लागेल, त्यानंतर ते बंद करण्याबाबत कारण सांगावे लागेल.

हप्ता वेळेवर भरणे गरजेचे

तुम्ही तुमचा विमा पॉलिसी हप्ता वेळेवर भरला पाहिजे. कारण काही लोक पॉलिसी करुन घेतात आणि नंतर पेमेंट करण्याचे विसरुन जातात. अशा स्थितीत जोखीम कवचही संपते आणि त्यांना मिळणारे पैसेही मिळत नाहीत. 

30 टक्क्यांपर्यंत सूट मिळतेय

दरम्यान, पॉलिसीधारकाला विलंब शुल्कावर 30 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे . तुम्हाला 1 लाखाच्या प्रीमियमवर 25 टक्के आणि 3 लाखांच्या प्रीमियमवर 30 टक्के सूट मिळत आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x