Bengaluru to Mumbai Road : मुंबई, देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारुपास आली आणि कैक वर्षापासून सातत्यानं या शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर सरकारनं भर दिल्याचं पाहायला मिळालं. सत्ता कोणाचीही असो, मुंबई प्रकाशझोतात आणण्यासाठी आणि तिच्या प्रगतीसाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. अशा या शहराशी देशातील काही महत्त्वाची शहरं, महानगरं रस्ते मार्गानं जोडण्यात आली.
दळणवळणाच्या सर्व सुविधांची उपलब्धता असणारं हेच मुंबई शहर येत्या काळात रस्ते मार्गानं देशातील आणखी एका महानगराशी जोडलं जाणार आहे. ज्यामुळं किमान वेळात कमाल अंतर ओलांडता येणार असून, त्यासोबत इंधनाची आणि पर्यायी पैशांचीही बचत होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच x च्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती सर्वांना दिली. जिथं त्यांनी या रस्त्याचे फोटो शेअर करत देशाची आर्थिक राजधानी टेक हब बंगळुरूशी जोडलं जाणार असल्याचं सांगत ही 'लाईफलाईन' सर्वांपुढे आणली.
कर्नाटकातील चित्रदुर्ग- दावणगिरी इथं हा 72 किमी अंतराचा सहा पदरी रस्ता तयार करण्यात आला असून, त्याचा प्रवाशांना फायदाच होणार आहे. पर्यावरण पूरक पर्यायांवर भर देत तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचा वापर मुंबई आणि बंगळुरूतील अंतर आणखी कमी करणार आहे.
Traverse the breathtaking vistas along the 6-lane Chitradurga-Davangere stretch , a lifeline linking Bangalore and Mumbai. This route isn't just about reaching destinations; it's a symphony of time-saving, fuel-efficient, and eco-friendly travel, weaving through Karnataka's… pic.twitter.com/bBxNrJOSxW
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) May 6, 2024
सदर प्रकल्पासाठी साधारण 1400 कोटी रुपयांचा एकूम खर्च येणार असून, भविष्यात त्याच्या देखभालीसाठी National Highway Authority of India (NHAI) च्या वतीनं काही शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. गडकरी यांच्या माहितीनुसार हा प्रकल्प कर्नाटकातील नेलमंगला ते देवीहल्ली या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 75 चा एक भाग असणार आहे. बंगळुरू आणि मुंबईमधील प्रवासवेळ कमी करण्यासोबतच हा महामार्ग चित्रदुर्ग आणि दावणगिरी येथील भूखंड व्यावसायिकांसाठी भरभराटीला ठरणार आहे.