त्या' त्रासाला कंटाळून लिंगायत समाजाच्या साधूंनी संपवलं आयुष्य; शेवटच्या पत्रात धक्कादायक खुलासा

कर्नाटकातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Updated: Oct 25, 2022, 12:57 PM IST
त्या' त्रासाला कंटाळून लिंगायत समाजाच्या साधूंनी संपवलं आयुष्य; शेवटच्या पत्रात धक्कादायक खुलासा title=

बंगळुरु : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील (Karnatka) लिंगायत (Lingayat) पंथाच्या एका साधूंनी सोमवारी आत्महत्या करत स्वत:ला संपववलंय. या साधूंनी कंचुगल बंदे मठात आत्महत्या केली. बसवलिंग स्वामी (Basavalinga Swami) असं त्यांचं नाव आहे. बसवलिंग हे  45 वर्षांचे होते. ते कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील (Ramnagar District) कंचुगल बंदे मठाचे प्रमुख होते. पोलिसांनी आता मृत्यूचा तपास सुरू केला आहे. तसेच पोलीस कॉल हिस्ट्री तपासत आहेत.  तसेच 2 पानांची सुसाईड नोट देखील सापडली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.  काही लोक माझा छळ करत आहेत आणि मला मुख्य पदावरून हटवण्याचा त्यांचा हेतू आहे, असं त्या सूसाईड नोटमध्ये म्हटलंय. (lingayat saint basavalinga swamy ended his life in karnataka)

बसवलिंग स्वामी हे 25 वर्षांपासून 400 वर्षे जुन्या मठाचे प्रमुख होते. याप्रकरणी कुडूर पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजता त्यांच्या काही शिष्यांना स्वामींचा मृतदेह आढळला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुद्द्यांवरून साधूला ब्लॅकमेल करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

बंदे मठाच्या शाळेतील शिक्षक असलेल्या रमेश यांनी याबाबत तक्रार दाखल केली. "रविवारी संध्याकाळी 5 वाजता घरी जाण्यापूर्वी आपण साधूची भेट घेतली होती. संध्याकाळी 6.10 च्या सुमारास त्यांना एका मठ कर्मचाऱ्याचा फोन आला. स्वामी घराचा  दरवाजा उघडत नसल्याचं आणि कॉल लागत नसल्याची माहिती मठातील कर्मचाऱ्याने रमेश यांना दिली", अशी माहिती पोलिसांनी रमेशने दिलेल्या माहितीनुसार दिली आहे. रमेश घराच्या मागील बाजूला गेले. तेव्हा स्वामींनी स्वत:ला संपवल्याचं लक्षात आलं, असं रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलंय.