Ram Mandir Inauguration LIVE : राम मंदिरावर 3 दिवस हेलिकॉप्टरमधून होणार फुलांचा वर्षाव

Ram Mandir Inauguration Live Updates: ज्या क्षणाची प्रत्येक देशवासियांनी वाट पाहिली तो राम मंदिर उदघाटन सोहळ्याचा क्षण काही ताासांवर येऊन ठेपला आहे. अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha)  22 जानेवारी  होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीपासून अख्खा देश रामाच्या स्वागतासाठी सजला आहे. 

Ram Mandir Inauguration LIVE : राम मंदिरावर 3 दिवस हेलिकॉप्टरमधून होणार फुलांचा वर्षाव

Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : पवित्र नगरी रामभूमी अयोध्येत श्रीरामांचं आगमन होणार आहे. सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram lala Pran Pratishtha) करण्यात येणार आहे. अयोध्येत या ऐतिहासिक राम मंदिर उदघाटन सोहळ्यासाठी (Ram Mandir Inaugration) तयारी पूर्ण झाली आहे.

21 Jan 2024, 09:53 वाजता

Ram Mandir Inauguration Live Updates : रामलल्लाची आज 114 कलशांच्या पाण्याने होणार दिव्य स्नान

प्रभू रामाच्या मूर्तीला आज  114 कलशांच्या पाण्याने दिव्य स्नान करण्यात येणार आहे. आज रामलल्लाच्या मंडपाचीही पूजा होणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितलं आहे की, आज देवतांची पूजा, हवन, पारायण इत्यादी, सकाळी मध्‍वधिवास, 114 वरून विविध औषधी पाण्याने मूर्तीचं स्नान होणार आहे. कलश, महापूजा. उत्सवमूर्तीची प्रसाद परिक्रमा, शय्याधिवास, तत्लन्यास, महान्यास आदिन्यास, शांत-पोषण-अघोर होम, व्याहती होम, रात्रीची जागर, सायंकाळची पूजा आणि आरती होईल.

21 Jan 2024, 09:45 वाजता

Ram Mandir Inauguration Live Updates : सरयू रेल्वे पूल उजळून निघालंय

उत्तर प्रदेशातील कटरा आणि अयोध्या दरम्यान सरयू नदीवरील रेल्वे पूल रात्रीच्या वेळी मंत्रमुग्ध करणाऱ्या दिव्यांनी उजळून निघालं आहे. 

21 Jan 2024, 09:44 वाजता

Ram Mandir Inauguration Live Updates : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक राममय 

22 जानेवारीला अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी अख्खा देश राममय झाला आहे. मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर आकर्षक रोषणाई करुन रामाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. 

21 Jan 2024, 09:29 वाजता

Ram Mandir Inauguration Live Updates : नेपाळमध्ये माता सीतेचे जनकपूर उजळले 

नेपाळमधील जनकपूर, माता सीतेचे मूळ गाव रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी प्रकाशमय झालंय. माता सीतेचे जनकपूर 'राम नाम'ने गुंजलंय. 

21 Jan 2024, 09:24 वाजता

Ram Mandir Inauguration Live Updates : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी घरी पूजा कशी करावी?

या ऐतिहासिक क्षणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे. अयोध्येला जाणं सगळ्यांना शक्य नाही. अशावेळी घरु बसून रामलल्लाची पूजा कशी करावी याबद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेली लिंक पाहा

अधिक माहितीसाठी लिंक - रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी घरी पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी आणि साहित्य

21 Jan 2024, 09:22 वाजता

Ram Mandir Inauguration Live Updates : प्राणप्रतिष्ठासाठी राम मंदिराला आकर्षित सजावट 

अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यासाठी मंदिराची आकर्षित सजावट करण्यात आली आहे. या मंदिराला 2500 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे. ही फुलं खास करुन थायलंड आणि अर्जेंटिनावरुन मागविण्यात आली आहे. तर गुजरातच्या माळी समाजाने सात राज्यांतून 300 क्विंटल फुलं पाठवली आहेत.

21 Jan 2024, 09:18 वाजता

Ram Mandir Inauguration Live Updates : 'ही रामलल्लाची अंतिम मूर्ती नाही'

रामलल्ला यांचा चेहरा समोर आल्यानंतर शिल्पकार अरुण योगीराज यांच्या पत्नी विजेता योगीराज यांनी एक वक्तव्य केलंय. त्या म्हणाल्या की, रामलल्लाच्या मूर्तीचं अंतिम रुप अद्याप समोर आलेलं नाही.