Exit Poll Lok Sabha Election 2024 LIVE: एक्झिट पोलनुसार कोणाला धक्का, कोणी मारली बाजी? पाहा प्रत्येक अपडेट

Exit Poll Results 2024 Lok Sabha Election:  देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीसह 4 राज्यातील विधानसभा निवडणुकाही झाल्या आहेत.   

Exit Poll Lok Sabha Election 2024 LIVE: एक्झिट पोलनुसार कोणाला धक्का, कोणी मारली बाजी? पाहा प्रत्येक अपडेट

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 Latest Updates: लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहेत. सातव्या टप्प्यात देशातील 7 राज्यं आणि एका केंद्राशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होत आहे. मतदानाचा हा अखेरचा टप्पा असून यानंतर थेट निकालाची प्रतिक्षा असणार आहे. 4 जूनला मतमोजणी होणार असून, यानंतर देशात सलग तिसऱ्यांदा भाजपाचं सरकार येणार की काँग्रेस बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. 

दुसरीकडे महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमका काय निकाल असेल याचीही प्रचंड उत्सुकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राची जनता काय कौल देते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 

दरम्यान निकालाचा अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल आज संध्याकाळी समोर येणार आहेत. Zee News चा एक्झिट पोलही 5 वाजल्यानंतर जाहीर होणार आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं स्पष्ट नाही, मात्र अंदाज देणारं चित्र स्पष्ट होईल. 

1 Jun 2024, 19:09 वाजता

रिपब्लिक टीव्ही-पी मार्क एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार, 'पुन्हा मोदी सरकार!'

रिपब्लिक टीव्ही-पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 359 जागा मिळून ते तिसऱ्यांदा सत्तेत परतत आहे. या एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीला 154 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना 30 जागा मिळाल्याचे दाखवले आहे.

1 Jun 2024, 19:06 वाजता

रिपब्लिक भारत-मॅट्रिझ एक्झिट पोलनुसार दिल्लीत एनडीएला 5-7 जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला 0 ते 2 जागा मिळू शकतात.

1 Jun 2024, 19:04 वाजता

टाईम्स नाऊ-ईटीजी रिसर्चचा एक्झिट पोल: झारखंडमध्ये निकाल कसा लागेल?

टाइम्स नाऊ-ईटीजी रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार, झारखंडमध्ये लोकसभेच्या 14 जागांपैकी भाजपला 13 जागा तर काँग्रेसला फक्त 1 जागा जिंकता आली आहे.

1 Jun 2024, 18:54 वाजता

(Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी ZEE NEWS जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)

1 Jun 2024, 18:53 वाजता

तामिळनाडूपाठोपाठ केरळचीही आकडेवारी समोर आली आहे. येथे लोकसभेच्या 20 जागा आहेत. काँग्रेसला 13 जागा मिळू शकतात. सीपीआय (एम)ला 2 जागा मिळू शकतात, तर सीपीआयला 1 जागा मिळू शकते. येथे भाजपचे खाते उघडत आहे. त्यांना 1 जागा मिळू शकते.

1 Jun 2024, 18:48 वाजता

कर्नाटकात एनडीएला 55 टक्के मते मिळाली आहेत. जागांच्या बाबतीत बोलायचे झाले तर एनडीएला 20 ते 22 जागा, इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा आणि जेडीएसला 3 जागा मिळाल्या आहेत. राज्यात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत.

1 Jun 2024, 18:45 वाजता

ॲक्सिस माय इंडियाने आपल्या एक्झिट पोलनुसार, तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीला 33 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तामिळनाडूमध्ये भाजपला 1-3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

1 Jun 2024, 18:34 वाजता

एक्झिट पोलचा पहिला आकडा समोर आलाय. जो तामिळनाडू राज्याचा आहे. येथे 39 लोकसभा जागांपैकी इंडिया आघाडीला 35 तर एनडीएला 4 जागा दाखवण्यात आल्या आहेत.

1 Jun 2024, 18:34 वाजता

एक्झिट पोलचा पहिला आकडा समोर आलाय. जो तामिळनाडू राज्याचा आहे. येथे 39 लोकसभा जागांपैकी इंडिया आघाडीला 35 तर एनडीएला 4 जागा दाखवण्यात आल्या आहेत.

1 Jun 2024, 16:23 वाजता

Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates:  एक्झिट पोलआधी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक 

एक्झिट पोल जाहीर होण्यापूर्वी काही तास आधीच इंडिया आघाडीची बैठक घेण्यात आली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी घेण्यात येणाऱ्या या बैठकीसाठी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी आणि तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक आघाडीचे नेतेही हजर असल्याचं पाहायला मिळालं.