अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांचा थोरला मुलगा वारला! भावूक होत म्हणाले, 'त्याला पाहून चिड यायची कारण...

Nana Patekar On His Elder Son's Death : नाना पाटेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत थोरल्या मुलाच्या निधनाविषयी वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 23, 2024, 01:03 PM IST
अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांचा थोरला मुलगा वारला! भावूक होत म्हणाले, 'त्याला पाहून चिड यायची कारण... title=
(Photo Credit : Social Media)

Nana Patekar On His Elder Son's Death : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्याचं कारण म्हणजे ते त्यांचे मुद्दे स्पष्टपणे मांडतात. काही झालं तरी ते खासगी आयुष्यावर खूप कमी बोलतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या निधनावर मोकळेपणानं सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूचं कारण सांगित असताना ते भावूक झाले. नाना पाटेकर यांनी सांगितलं की जन्माच्या वेळी त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला होता आणि त्यामुळेच त्याचे निधन झाले.

नाना पाटेकर यांनी 'द लल्लनटॉप' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्यांच्या मोठ्या मुलाच्या डोळ्यात काही समस्या होती. त्यामुळे त्याला दिसत नव्हतं. त्याविषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, 'त्याला पाहून मला खूप चिड आली कारण माझं असं झालं की लोक काय म्हणतील नानाचा मुलगा कसा आहे. मी याविषयी विचारच केला नाही की त्याला काय त्रास होत असेल त्याला नक्की काय वाटत असेल. मी फक्त हा विचार केला की लोकं माझ्या मुलाविषयी काय विचार करतील. त्याचं नाव दुर्वासा होतं. तो आमच्यासोबत अडीच वर्ष राहिला पण तुम्ही काय करु शकता. आयुष्यात काही गोष्टी या ठरलेल्या असतात.'नाना पाटेकरनं खुलासा केला की त्यांना मुलाचं नाव हे नेहमीत रागात असणाऱ्या ऋषी दुर्वासा यांच्या नावावर ठेवलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्यांनी सांगितलं की त्यांची पत्नी नीलाकांती यांच्याशी कशी भेट झाली हे देखील सांगितलं. त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांची भेट ही नाटका दरम्यान, झाली होती. त्या बॅंक अधिकारी होत्या. त्यांना अडीच हजार रुपये पगार मिळायचा. नीलाकांती त्यांना म्हणाल्या की जर त्यांना नाटकात वगैरे काम करायचं असेल तर ते करु शकतात. कारण पैसे तसेही आलेच असते. 

हेही वाचा : विजय थलपतीचं बर्थडे सेलिब्रेशन चाहत्याच्या जीवावर बेतलं असतं; आग विझवायला पाण्याऐवजी चुकून पेट्रोल टाकलं अन्...

नाना पाटेकर यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या बहिणीमुळे सिगारेट पीनं बंद केलं होतं. त्यांनी सांगितलं की माझं स्मोकिंग बंद करण्याचं कारण माझी बहीण आहे. तिनं तिच्या ऐकूलत्या एका मुलाला गमावलं होतं. त्यावेळी मी दिवसभरात जवळपास 60 सिगारेट प्यायचो. मी अंघोळ करताना देखील सिगारेट प्यायचो. पण ही खूप वाईट गोष्ट होती. त्या वासामुळे कोणीच माझ्या गाडीत बसत नव्हतं. मी कधीच मद्यपान केलं नाही पण स्मोकिंग खूप करायचो. माझ्या बहिणीनं नंतर मला स्मोक केल्यानंतर खोकताना पाहिलं. तिनं सांगितलं की तुला आणखी काय पाहायचं आहे? हे ऐकल्यानंतर नाना पाटेकरांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी त्या दिवसापासून स्मोकिंग करणं सोडलं.