No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे. 

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा

Parliament Monsoon Session Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे. ज्या जोमाने विरोधक मोदी सरकारला आव्हान देण्यात गुंतले आहेत, त्याच जोमाने मोदी सरकारने संसदेत उत्तर देण्याची तयारी केली आहे. राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर केल्यानंतर मोदी सरकार आता आक्रमक मूडमध्ये आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिल्ली सेवा विधेयक मंजूर करून एनडीएने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता अविश्वास ठरावावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. 

8 Aug 2023, 17:48 वाजता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार?

 

Raju Shetti Vs Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची चिन्हं आहेत. 15 ऑगस्टच्या बैठकीलाही तुपकर आले नाहीत, तर पाच लोकांची समिती त्यांच्यासंदर्भात निर्णय घेईल, अशी माहिती अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलीय. तुपकरांचा रोख आपल्यावर असल्यानं आपण या निर्णय प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असं शेट्टींनी स्पष्ट केलंय. दरम्यान आजच्या शिस्तपालन समितीच्या पुण्यातल्या बैठकीला रविकांत तुपकर गेले नाहीत. संघटनेच्या हितासाठी नाराजी असल्याची प्रतिक्रिया तुपकरांनी दिलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

8 Aug 2023, 16:07 वाजता

No Confidence Motion 2023 Live: शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी  विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. आज सभागृहातील चर्चा ही अविश्वासाची नाही, तर अविश्वासाविरुद्ध जनविश्वासाची आहे कारण जनतेचा विश्वास मोदींवर आहे. विरोधकांनी आपल्या युतीचे नाव बदलून यूपीए ते भारत केले आहे. त्यांना यूपीए नावाची लाज वाटते, कारण यूपीएचे नाव ऐकताच लोकांना भ्रष्टाचार, घोटाळे, दहशतवादी हल्ले आठवतात असा घणाघात श्रीकांत शिंदे यांनी केला.

8 Aug 2023, 14:51 वाजता

No Confidence Motion 2023 Live: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आंनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताबडतोब राजीनाम्याची मागणी केली आहे. दंगल, खून आणि बलात्काराची 10 हजार प्रकरणे समोर आली आहेत. आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेत निवेदन करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी लोकसभेत उपस्थित राहतील तेव्हा राहुल गांधी विधान करणार आहेत.

8 Aug 2023, 14:40 वाजता

निशिकांत दुबे यांचा विरोधांकवर निशाणा
No Confidence Motion 2023 Live: भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर निशाणा साधला. अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी येणार असल्याचे आम्ही यापूर्वी ऐकत होतो, मात्र ते आले नाहीत. कदाचित त्यांना उशिरा जाग आली असेल. गौरव गोगई यांनी प्रथम चर्चा सुरू केली ही चांगली गोष्ट आहे. गौरव गोगोई यांच्या भाषणाचा संदर्भ देत निशिकांत दुबे म्हणाले की, 83 च्या निवडणुकीत आसाममध्ये किती टक्के लोकांनी मतदान केले. किती लोक मारले गेले. तुम्ही मिझोराममध्ये 7 टक्के मतांच्या जोरावर सरकार चालवू दिले. संपूर्ण देशाला कळायला हवं असा हल्लाबोल दुबे यांनी केला. 

8 Aug 2023, 14:39 वाजता

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. आधी राहुल गांधी चर्चेला सुरुवात करणार होते, पण शेवटी गौरव गोगोई यांनी बोलण्यास सुरुवात केली. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मणिपूर हिंसाचारप्रकरणावर सवाल उपस्थित केला.  पंतप्रधान मोदी आजपर्यंत मणिपूरला का गेले नाहीत? 80 दिवसांनी ते या विषयावर का बोलले? पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही? असे सवाल गौरंग गोगोई यांनी उपस्थित  केले.

मणिपूरमधील भजपचं सरकार अपयशी ठरले आहे हे पंतप्रधानांना मान्य करावं लागेल, असं गौरव गौगई यांनी म्हटलंय.. म्हणूनच, मणिपूरमध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला, 5000 घरे जाळली गेली, सुमारे 60,000 लोक बेघर झाली आहेत, सुमारे 6500 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संवाद, शांतता आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला हवे होते, त्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांत चिथावणीखोर पावले उचलल्याने समाजात तणाव निर्माण झाला आहे असा आरोप काँग्रेस नेते गोगोई यांनी केला आहे.