LAC पर तैनात जवानांना लडाखचे स्थानिक लोकं पुरवतायंत पौष्टिक वस्तू

सीमेच रक्षण करणाऱ्या जवानांची स्थानिक लोकांकडून कर्तव्य म्हणून सेवा

Updated: Sep 18, 2020, 07:33 PM IST
LAC पर तैनात जवानांना लडाखचे स्थानिक लोकं पुरवतायंत पौष्टिक वस्तू

लडाख : LAC वर चीनसोबत तणावाचं वातावरण असताना भारत सरकारने देखील मोठ्या प्रमाणात सैन्य सीमेवर पाठवलं आहे. लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य आहे. या दरम्यान लडाखमधील स्थानिक लोकं जवानांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. येथील स्थानिक लोकं मोठ्या प्रमाणात खाण्याच्या वस्तू जवानांना पाठवत आहेत. ज्यामध्ये छुर्पे या पदार्थाचा देखील समावेश आहे. छुर्पे हे सुकवलेल्या पनीर सारखं असतं. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं आणि अनेक महिने ते टिकतं.

गावातील स्थानिक लोकं पौष्टीक गोष्टी जवानांना पुरवत आहेत. लडाखमध्ये तैनात असलेल्या जवानांना थंड वातावरणात याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. 

याशिवाय येथील वाळलेले वाटाणे हा देखील येथील एक स्थानिक पदार्थ आहे. जो राजमा प्रमाणे उकळून खाता येऊ शकतो. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतं. लडाखमधील लोकं अशा रोट्या बनवत आहेत ज्या १५ दिवस खराब होत नाहीत. गावागावातून एकत्र केलेल्या या सर्व वस्तू जवानांपर्यंत पोहोचवले जात आहेत.

देशाचे जवान कठीण परिस्थितीत सीमेवर तैनात असतात. कोणत्याही वातावरणात ते आपल्या कर्तव्यापासून दूर जात नाहीत. जीवाची बाजी लावून देशाची रक्षा करतात. अशा जवानांसाठी स्थानिक लोकं देखील आता पुढे येऊन त्यांना मदत करत आहेत.