मतदान मोजणीदरम्यान हिंसा होण्याची शक्यता, केंद्राला संशय

देशात लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या मतदानाची मोजणी होत आहे. यावेळी हिंसा होण्याची शक्यता आहे.  

Updated: May 22, 2019, 09:51 PM IST
मतदान मोजणीदरम्यान हिंसा होण्याची शक्यता, केंद्राला संशय

नवी दिल्ली : देशात लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या मतदानाची मोजणी होत आहे. यावेळी हिंसा होण्याची शक्यता आहे. तसे सर्तकेचे राहण्याचे आदेश केंद्राने सर्व राज्यांना दिले आहेत.  ईव्हीएम छेडछाडीवरून विरोधी पक्षांनी एकीकडे राळ उठवली आहे. तर दुसरीकडे उद्या होणाऱ्या मतमोजणी दरम्यान हिंसा घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. तसेच प्रक्षोभक वक्त्यव्यांच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढवण्याची सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत.

२३ मे रोजी देशात अनेक ठिकाणी मतमोजणी होणार आहे. यावेळी हिंसा घडवण्यात येईल, असा संशय केंद्र सरकारला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि पोलिसांना सतर्कत राहण्याच्या सूचना दिला आहेत.  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले गेले आहेत. दरम्यान, बिहारमधील राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी मंगळवारी वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. एवढच नव्हे तर गरज पडल्यास शस्त्रही उचलू, असे कुशवाह म्हणाले होते. यामुळे काही ठिकाणी परिस्थिती तणावाची बनली आहे.

तसेच ईव्हीएम मशिन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढण्याच्या सूचना केंद्राकडून करण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्यांत सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.