Investment Tips: 10 कोटींचा परतावा मिळवण्यासाठी किती वर्ष करावी लागेल गुंतवणूक?

Long Term Investment Tips: अनेकांना असं वाटतं असतं की आपली संपत्ती वाढवण्यासाठी आपण जास्त रक्कमेपासून गुंतवणूक करावी. परंतु हा फंडा प्रत्येक वेळेस यशस्वी होईलच असं नाही. त्यातून जर का तुम्हाला चांगले आणि जास्तीचे रिटर्न्स (Returns) हवे असतील तर तुम्हाला मोठ्या रकमेपासूनच सुरूवात करायला हवी असे नाही. 

Updated: Feb 24, 2023, 10:30 AM IST
Investment Tips: 10 कोटींचा परतावा मिळवण्यासाठी किती वर्ष करावी लागेल गुंतवणूक?  title=

Long Term Investment Tips: दिवसेंदिवस आपल्या गरजा या वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या खर्चावर आणि बचतीवर (Savings) लक्ष केंद्रित करणे फार आवश्यक झाले आहे. अनेकांना अशी चिंता असते असते की वाढत्या महागाईचे (Inflation) परिणाम भविष्यात कसे होणार? त्यामुळे आपण आत्तापासूनच गंतवणूक करायला सुरूवात करतो. ही गुंतवणूक पुढल्या दहा वर्षांमध्ये कशी असेल याची चाचपणी करण्यासाठी आपणही गुंतवणूक सल्लागारांची भेट घेतो. परंतु गुंतवणूक (Investment) कशी करावी? त्यातून काही काळ गेल्यानंतर आपल्याला त्या गुंतवणूकीतून किती परतावा मिळेल याबद्दलही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हा जाणून घेऊया तुम्ही जर का आज गुंतवणूक केलीत तर पुढील 10 वर्षांत तुम्हाला किती परतावा मिळेल. 

अनेकांना असं वाटतं असतं की आपली संपत्ती वाढवण्यासाठी आपण जास्त रक्कमेपासून गुंतवणूक करावी. परंतु हा फंडा प्रत्येक वेळेस यशस्वी होईलच असं नाही. त्यातून जर का तुम्हाला चांगले आणि जास्तीचे रिटर्न्स (Returns) हवे असतील तर तुम्हाला मोठ्या रकमेपासूनच सुरूवात करायला हवी असे नाही. तुम्ही छोट्या रकमेपासूनही सुरूवात करू शकता. त्यातून तुम्हाला जर का समाधानकारक रक्कम काही वर्षांनी हातात हवी असेल तर तुम्हाला गुंतवणूकीद्वारे काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 

गुंतवणूकी आधी लक्षात ठेवा ह्या गोष्टी..

तुम्हाला तीन गोष्टी गुंतवणूकीसाठी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एक म्हणजे गुंतवणूक सुरू करायला फार उशीर करू नका. जेव्हा गुंतवणूक सुरू कराल तर त्यात सातत्य ठेवा आणि जसे तुमचे उत्पन्न वाढेल तशी तुमची गुंतवणूकही वाढवा त्याचसोबत दरवर्षी आपली गुंतवणूक कशी वाढेल यावर भर द्या. काही लोकं फक्त त्यातून परतावा कसा वाढेल यावर भर देतात. 

दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा

गुंतवणूक करताना आपली अशी एक स्ट्रॅटेजी (Investment Strategy) ठरवा त्यातून तुम्हाला दीर्घ काळातील गुंतवणूकीतून काय अपेक्षित आहे यावर लक्ष केंद्रित करा म्हणजेच तुम्हाला गुंतवणूकीद्वारे तुमच्या कोणत्या प्रामुख्यानं गरजा भागवायच्या आहेत याकडे लक्ष द्या. जास्तीचा परतावा कधी मिळेल याकडे धावू नका तर तुमच्या गुंतवणूकीत कशी शिस्त येईल याचा विचार करा. 

१० कोटींची गुंतवणूककशी कराल..

जर का तुम्हाला 10 कोटींची गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला कशी गुंतवणूक करावी लागेल? जर तुम्ही SIP मध्ये 25,000 रूपयांची गुंतवणूक करत असाल तर 8, 10 आणि 12 टक्के वार्षिक परताव्याच्या हिशोबानं जोखिमेशिवाय तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. 10 कोटींचा परतावा साध्य करण्यासाठी SIP द्वारे 5 ते 15 वर्षांनी कमी करता येईल. 

तुम्हाला जर का चांगले रिटर्न्स हवे असतील तर 20 टक्क्यांनी वाढवली तर तुम्हाला वार्षिक 12 टक्के रिटर्न्स देतील म्हणजे थोडक्यात तुम्ही जर का तुमची गुंतवणूक वाढवलीत तर तुमचा कालावधी कमी होईल. तुमच्या गुंतवणूकीतून जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करा ते म्हणजे गुंतवणूकीवर वाढीवर. त्यातून तुम्हाला जोखिममुक्त (Long Term Investment With Risk and Without Risks) गुंतवणूक करायची आहे हेही विसरू नका.