गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

आजपासून नवीन दर लागू होणार आहेत

Updated: Feb 12, 2020, 01:46 PM IST
गॅस सिलेंडरच्या दरात वाढ title=
संग्रहित फोटो

मुंबई : बुधवारपासून गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात वाढ झाली आहे. आता एका सिलेंडरमागे जवळपास १५० रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. आजपासून नवीन दर लागू होणार आहेत. नवीन किंमती तातडीने अंमलात आणल्या गेल्या आहेत. इंडियन ऑईलनुसार, मुंबईत गॅस सिलेंडरच्या दरात १४५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होत आहे. तर दुसरीकडे तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा स्वयंपाक घरातल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत वाढ केली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईत गॅस सिलेंडरच्या दरात १४५ वाढ झाल्याने आता सिलेंडरची किंमत ८२९.५० रुपये इतकी झाली आहे. 

दिल्लीत १४ किलो सिलेंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांची वाढ झाली असून आता सिलेंडर ८५८.५० रुपये इतका झाला आहे. तर कोलकातामध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतीत १४९ रुपयांची वाढ होत सिलेंडर ८२९.५० रुपयांवर पोहचला आहे. चैन्नईतही सिलेंडरच्या दरात १४७ रुपयांच्या वाढीसह बिना सब्सिडी एलपीजी गॅस मिळणार आहे.   

गॅस सिलेंडरबाबत हे नियम माहितीयेत?