Lucknow Girl : भररस्त्यात कानाखाली खालेल्या कॅब चालकाचा मोठा निर्णय, घटनेचा असाही परिणाम

लखनऊमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल 

Updated: Nov 23, 2021, 07:35 AM IST
Lucknow Girl : भररस्त्यात कानाखाली खालेल्या कॅब चालकाचा मोठा निर्णय, घटनेचा असाही परिणाम  title=

मुंबई : यावर्षी ऑगस्ट महिन्यात लखनऊमध्ये एका मुलीने कॅब चालकाला भररस्त्यात कानाखाली मारली. ही घटना वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. कॅब चालकाने या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. 

सादत अली या कॅब ड्रायव्हरने चक्क 22 कानाखाली त्या महिलेकडून खाल्ल्या. त्याने राजकारणात प्रवेश केला आहे. राजकारणात येऊन पीडित पुरुषांसाठी लढणार असून अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे सआदत सांगतात.

22 कानाखाली खाणाऱ्या पुरूषाची राजकारणात एन्ट्री 

सहयोगी वेबसाइट डीएनएच्या रिपोर्टनुसार, सादत अलीने शिवपाल यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पार्टीमध्ये (पीएसपी) प्रवेश केला आहे. राजकारणात आल्यानंतर सादत अली म्हणाले की, मी देशभरातील कॅब ड्रायव्हर्सचा आवाज बनणार आहे. जिथे पुरुषांवर अन्याय होईल, तिथे पुरुषांचा छळ करणाऱ्या महिलांच्या विरोधात उभा राहीन.

राजकारणात प्रवेश करण्यामागचं कारण 

सादत अलीच्या म्हणण्यानुसार, 'अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे पुरुषांची सुनावणी झालेली नाही. मला अजून न्याय मिळालेला नाही. तर माझ्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ संपूर्ण जगाने पाहिला. म्हणूनच त्यांनी आता पुरुषांचा आवाज उठवण्यासाठी राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. 

जेणेकरून त्यांना न्याय मिळेल आणि त्यांना इतर पुरुषांनाही मदत करता येईल. त्याच्यासोबत आलेल्या सादत अलीच्या वकिलाने सांगितले की, पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने तो राजकीय पक्षात सामील झाला आहे.

मुलीने तब्बल 22 कानाखाली मारली 

या वर्षी 30 जुलै रोजी लखनऊमधील बारबिरवा चौकात प्रियदर्शनी यादव या महिलेने सादत अलीला कोणतेही कारण नसताना 22 कानाखाली मारली होती. त्यादरम्यान वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. 

मात्र तरुणीने कॅब चालकाला कानाखाली मारण काही थांबवलं नाही.  चौकाचौकात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुलीच्या वागण्यावर अनेकांनी टीका केली.

या घटनेनंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर कॅब चालकाला पोलिसात गुन्हा नोंदवण्यात यश आले. मात्र आजपर्यंत आरोपी तरुणी प्रियदर्शनी यादववर कोणतीही कारवाई झालेली नाही.