VIDEO : पाण्याच्या टाकीत सापडला कुबेराचा खजिना, नोटा सुकवण्यासाठी अधिकाऱ्यांचा जुगाड

एका व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपये आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Updated: Jan 10, 2022, 02:55 PM IST
VIDEO : पाण्याच्या टाकीत सापडला कुबेराचा खजिना, नोटा सुकवण्यासाठी अधिकाऱ्यांचा जुगाड title=

Shocking Video: मध्यप्रदेशमधल्या दामोह इथं आयकर विभागाने एका व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या जमवलेले करोडो रुपये आणि दागिने जप्त केले आहेत. 

मद्य व्यावसायिक शंकर राय यांच्या घरावर आयकर विभागाने (Income Tax) छापा टाकला. यावेळी तब्बल ८ कोटी रुपये आणि तीन किलो सोनं आयकर विभागाच्या हाती लागलं आहे. विशेष म्हणजे  नोटा भूमिगत असलेल्या पाण्याच्या टाकीत (Cash in Water Tank) एका पिशवीत लपवून ठेवल्या होत्या. यासंदर्भात सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये आयटी विभागाचे अधिकारी इस्त्री आणि हेअर ड्रायरच्या सहाय्याने पैसे सुकवताना दिसत आहेत. 

पाण्याच्या टाकीत पैशांची बॅग
आयकर छाप्याचे नेतृत्व करणारे जबलपूरचे आयकर सह आयुक्त मुनमुन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने राय कुटुंबाकडून ८ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे, त्यात पाण्याच्या टाकीत एक कोटी रुपयांची रोकड असलेली बॅग आहे. याशिवाय तीन किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे. आयकर विभागाकडून आता जप्त केलेली कागदपत्रे आणि बेनामी संपत्तीची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे अंतिम आकडा येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Meme wala (@memewalanews)

३९ तास सुरु होती कारवाई
आयकर विभागाची तब्बल ३९ तास कारवाई सुरु होती. आयकर अधिकाऱ्यांनी शंकर राय यांच्या कुटुंबाच्या दहाहून अधिक ठिकाणी छापे टाकले. उद्योगपती शंकर राय हे काँग्रेसचे नेते आणि माजी नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत, तर त्यांचे भाऊ कमल राय हे भाजपचे नेते असून ते पालिकेचे उपाध्यक्ष आहेत. 

दारूच्या व्यवसायासोबतच राय कुटुंबाचा वाहतूक, हॉटेल, बार आणि पेट्रोल पंपासोबत पैसे उधार देण्याचाही व्यवसाय आहे.