गोकुळाष्टमी उत्सव : मंदिरात चेंगराचेंगरी, गुदमरुन 2 भाविकांचा मृत्यू तर 6 जखमी

Major accident in Banke Bihari temple : गोकुळाष्टमीच्या उत्सवाला मथुरेत गालबोट लागले आहे. मथुरेतील बांके बिहारी मंदिरात मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत गुदमरुन दोन भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत.  

Updated: Aug 20, 2022, 09:27 AM IST
गोकुळाष्टमी उत्सव : मंदिरात चेंगराचेंगरी, गुदमरुन 2 भाविकांचा मृत्यू तर 6 जखमी title=

पाटणा : Major accident in Banke Bihari temple : गोकुळाष्टमीच्या उत्सवाला मथुरेत गालबोट लागले आहे. मथुरेतील बांके बिहारी मंदिरात मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत गुदमरुन दोन भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत. मंगला आरतीवेळी ही दुर्घटना घडली. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलिवण्यात आले असून त्यांच्याव उपचार सुरु आहेत. 

श्रीकृष्ण जन्मोत्सवानंतर बांके बिहारी मंदिरात मंगला आरतीवेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बांके बिहारी मंदिरात ठाकूर बांके बिहारींच्या दर्शनासाठी जमलेल्या गर्दीमुळे बांकेबिहारी मंदिरात पाय ठेवायलाही जागा नव्हती, त्यामुळे मंदिर परिसरात उपस्थित भाविकांना गुदमरायला सुरुवात झाली. यावेळी दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर सह जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघातानंतर मथुरेच्या एसएसपी यांनी सांगितले की, बांके बिहारी मंदिरात मंगला आरती दरम्यान, एक भक्त मंदिराच्या बाहेर पडण्याच्या गेटवर बेशुद्ध झालेला आढळून आला. त्यामुळे भाविकांच्या येण्याजाण्यावर मर्यादा आल्या. मंदिरात लोकांची मोठी गर्दी होती. यामुळे मंदिर परिसरात झुंबड उडाली आणि लोकांचा श्वास कोंडला गेला आणि गुदमरायला सुरुवात झाली. या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला.