कॅशबॅक क्रेडिट कार्ड : जेवढे रुपये खर्च करणार तेवढेच मिळणार परत

क्रेडिट कार्डमधून पैसे कमवा 

Updated: Jun 30, 2021, 07:17 AM IST
कॅशबॅक क्रेडिट कार्ड : जेवढे रुपये खर्च करणार तेवढेच मिळणार परत  title=

मुंबई : क्रेडिट कार्ड अनेक पद्धतीचे असतात. मात्र या सगळ्यात खास आहे कॅशबॅक क्रेडिट कार्ड. खर्च करत जा आणि प्रत्येक शॉपिंगवर कमाई देखील करत जा. यामध्ये तुम्ही जितके रुपये खर्च कराल त्याप्रमाणे तुम्हाला कॅशबॅक मिळत जाईल. (Make Money Every Time : When spend by Credit Card Know about Cashback and rewards facility ) हे क्रेडिट कार्ड जे लोक ऑनलाईन भरपूर शॉपिंग करतात त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. 

सामान्य माणसाच्या मनात एख प्रश्न येऊ शकतो की, क्रेडिट कार्ड हे सगळे सारखेच असतात. मग हे कॅशबॅक क्रेडिट कार्ड काय आहे? क्रेडिट कार्डचा सरळ अर्थ असतो की, आता खर्च करा आणि पुढच्या महिन्यात पैसे भरा. मात्र काही क्रेडिट कार्ड असे असतात जे अतिरिक्त सुविधा देखील देतात. 

काही क्रेडिट कार्ड्स रिवॉर्ड पॉइंट्स देतात तक काही स्पेशल डील आणि डिस्काऊंट देतात. तर काही कार्ड असतात जे खर्च केल्यावर कॅशबॅक देतात. या वेगवेगळ्या कार्डमधून ग्राहकाला आपल्यासाठी कोणतं कार्ड उपयुक्त आहे. हे ओळखायचं आहे. 

1. काय आहे कॅशबॅक क्रेडिट कार्ड?

कॅशबॅक क्रेडिट कार्ड एक युनिक कार्ड आहे. मात्र सगळ्यात एक खास गोष्ट आहे की, कॅशबॅक क्रेडिट कार्डने एक एक रुपये खर्च केल्यावर रिटर्न पैसे मिळणार आहे. काही कार्ड असे असतात जे शॉपिंग केल्यावर काही रक्कम दिली जाते. उदहरणार्थजर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केल्यावर त्यातील काही परसेंट रुपये कार्डमध्ये परत पाठवते. काही कार्ड जास्त कॅशबॅक देतात. 

2. घरातील खर्चावर जास्त फायदा 

एका व्यक्तीने क्रेडिट कार्डने किराणा सामान खरेदी केलं. तसेच घरातील लाईट बिल, पाणी बिल भरतात. त्या व्यक्तीला क्रेडिट कार्डमध्ये कॅशबॅक मिळालं आहे. क्रेडिट कार्डमध्ये 1 परसेंटने जोडलं तर 150 रुपये क्रेडिट खात्यात जोडले जातात.  

3. प्रत्येक खर्चावर कॅशबॅक मिळतं का? 

सामान्यपणे खर्च केल्यावर कॅशबॅक मिळतं. विजेचं बिल, पाणी बिल किंवा इतर अन्य बिल भरल्यावर कॅशबॅक मिळतं. मात्र या कार्डमधून पैसे काढल्यावर हे कॅशबॅक मिळत नाही. 

4. कॅशबॅक कार्डमधून आणखी काय फायदा? 

क्रेडिट कार्डचं ग्रोसरी कंपन्यांशी टायअप असतं. काही कंपन्यांमधून अधिक कॅशबॅक मिळतं. रिटर्न मिळणारी ही कॅशबॅक 2-4 टक्के पेक्षा जास्त असते. तसेच ब्रँडेड कपडे आणि पेट्रोल पंपावर क्रेडिट कार्डचा वापर केल्यास फायद्यात राहाल. काही कार्ड साइन ऑन बोनस सुविधा देतात. 

5. अशा कार्डवर वार्षिक चार्ज देखील लावले जातात

काही कार्ड असे असतात ज्यावर ऍन्युअल फीस आकारली जाते. काही कार्ड फ्री असतात. कार्ड घेताना तुम्हाला तुमच्या बँकेला हे कार्ड फ्री आहे की चार्जेबल आहे हे विचारावं लागेल. मात्र जे कार्ड ऍन्युअल फी आकारतात त्यावर जास्त कॅशबॅक मिळतं.