ममता बॅनर्जींचा फोन होतोय टॅप

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे.

Updated: Nov 3, 2019, 12:28 PM IST
ममता बॅनर्जींचा फोन होतोय टॅप title=

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला फोन टॅप केला जात असल्याचा दावा केला आहे. आपल्याकडे याचे पुरावेही असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बॅनर्जी यांनी राज्य सचिवालय नबन्ना येथे पत्रकारांना सांगितले की, 'माझा फोन टॅप करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे, याचे रीतसर पुरावे देखील माझ्याकडे आहेत.'

या प्रकरणी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे. मीडिया, न्यायाधीश आणि अन्य महत्वाच्या व्यक्तींच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी सरकार इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपकडून मदत घेत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

व्हाट्सएप हॅकिंच्या प्रकरणात हॅकर्सने अनेक लोकांचे फोन हॅक करण्यासाठी वेगवेगळ्या नंबरचे अकाउंट्स सुरू केले. हे खोटे अकाउंट ब्राझील, इस्रायल, स्वीडन आणि इंडोनेशिया या देशांमध्ये कार्यरत आहेत. व्हाट्सॅप अकाउंट हॅक करण्यासाठी पिगाससने व्हाट्सॅपच्या सर्वरचा वापर केला आहे.