दुकानातील मिठाई खाताना काळजी घ्या, गुलाबजाममध्ये आढळला जिवंत किडा

Viral Worm in Gulabjaam Video: हल्ली जेवणात भेसळ असल्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडताना दिसतात. त्यात अशीच एक घटना घडली आहे ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली आहे. चक्क गुलाबजाममध्ये एक कीडा पडला आहे, हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 29, 2023, 07:14 PM IST
दुकानातील मिठाई खाताना काळजी घ्या, गुलाबजाममध्ये आढळला जिवंत किडा title=
Man finds worm wriggling on gulab jamun video viral latest instagram trends

Viral Worm in Gulabjaam Video: नुकताच सणांचा मोहोल संपला आहे. परंतु गोड पदार्थांची विक्री तर 365 दिवस सुरू असते. सध्या या वेळी चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका व्हायरल व्हिडीओची. एका इसमानं गुलाबजाम खरेदी केले होते. परंतु गुलाबजाम खरेदी केल्यानंतर त्यानं कीडा सापडल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपुर्वी हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे या व्हायरल व्हिडीओमुळे नागरिकही जागृक झाले आहेत. सध्या या व्हिडीओखाली अनेक जणं नाना तऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत. यावेळी हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. नक्की हा प्रकार काय घडला आहे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. सध्या अशा व्हिडीओंमुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. 

यावेळी एका इसमानं एका उच्चभ्रु मिठाईच्या दुकानातून गुलाबजाम विकत आणले होते. परंतु त्यात पांढरा कीडा आढळ्यानं एकच खळबळ माजली आहे. ज्यानं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे तो एक सोशल मीडिया फूड ब्लोगर आहे. त्याच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांच्या नाना तऱ्हेच्या कमेंट्सही येऊ लागल्या आहेत. यावेळी त्यानं ज्या मिठाईच्या दुकानातून त्यानं गुलाबजाम खरेदी केले होते. त्याला इन्स्टाग्रामवर टॅग केले आहे आणि तुमच्याकडून ही अपेक्षा नाही असंही म्हटलं आहे. या व्हिडीओ हा पांढरा कीडा अगदी स्पष्टपणे दिसतो आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तामिळनाडू येथील कोयम्बटूरमधल्या एका फूड ब्लॉगरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ही घटना चेन्नईच्या एका दुकानातील आहे. @tn38_foodie या इन्स्टाग्राम युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

हेही वाचा : अंगात 100 ताप, अशक्तपणा आणि... लग्नानंतर 'अशा' अवस्थेतही केले अभिनेत्रीनं नाटकाचे प्रयोग

यावेळी नेटकरीही अनेक तऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यामुळे याची जोरात चर्चा आहे. त्यातून सध्या काही जणं याचा जोरात विरोध करत आहेत तर काही जणं याचे समर्थनही करत आहेत. एकानं लिहिलंय की 'हा व्हिडीओ पोस्ट करण्याची काय गरज होती? चुका होतात कधी कधी माणसांकडून' तर एकानं लिहिलंय की, 'परत नवी पोलखोल झाली' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या सोशल मीडियावर याची जोरात चर्चा आहे. त्यामुळे परत एकदा ग्राहकांनी किती जागरूक असायला पाहिजे याची प्रचिती यावरून आली आहे. सध्या हा व्हिडीओ सर्वत्र जोरात व्हायरल होत असून यावेळी 5 लाखांहून अधिक लोकांनी हा पाहिला आहे.