चालत्या गाडीवर तरुणाचा खतरनाक स्टंट, उभा राहताच गेला तोल आणि... पुढे घडला धक्कादायक प्रकार

खरंतर हा व्हायरल होणारा व्हिडीओ रात्रीच्या अंधारातील आहे. या अंधारात तुम्ही पाहू शकता की, एक तरुण गाडीवर बसुन स्टंट करत आहे.

Updated: Jul 18, 2022, 05:20 PM IST
चालत्या गाडीवर तरुणाचा खतरनाक स्टंट, उभा राहताच गेला तोल आणि... पुढे घडला धक्कादायक प्रकार title=

लखनऊ : इंटरनेटवर अनेक स्टंट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. खरंतर वेगवेगळं कन्टेन्ट बनवण्याच्या आणि प्रसिद्ध होण्याच्या नादात तरुण मंडळी अशा काही गोष्टी करु लागल्या आहेत की, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. ही तरुण मंडळी प्रसिद्धीसाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीय. ज्यासंबंधीत अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. जे पाहून आपला थरकाप उडतो. तसे सोशल मीडियावर काही स्टंट फेल झाल्याचे देखील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जे तरुणांसाठी उदाहरण म्हणून समोर आले आहेत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

खरंतर हा व्हायरल होणारा व्हिडीओ रात्रीच्या अंधारातील आहे. या अंधारात तुम्ही पाहू शकता की, एक तरुण गाडीवर बसुन स्टंट करत आहे. हा स्टंट इतका खरतनाक आहे की, आपण असं काही करण्याचा स्वप्नात देखील विचार करणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण कचऱ्याच्या ट्रकवर पुश-अप करत आहे आणि बॅक ग्राउंडमध्ये शक्तीमानचं टायटल साँग सुरु आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, तरुण या कचऱ्याच्या ट्रकवर पुशअप करत आहे, तो ट्रक एका ठिकाणी उभा नसुन तो रस्त्यावर वेगाने धावत आहे.

तेवढ्यात या तरुणासोबत असं काही घडतं की, पाहून तुम्हाला धक्का बसेल.

खरंतर पुशअप केल्यानंतर हा तरुण चालत्या ट्रकवर उभा राहातो. ज्यानंतर त्याचा अचानक तोल जातो आणि तो खाली पडतो. हा अपघात इतका भयानक होता की, या तरुणाचे प्राण वाचतील याची अपेक्षाच कमी होती. परंतु या तरुणाचं नशीब इतकं चांगलं आहे की, त्याचे प्राण वाचले आहेत.

परंतु या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या हातापासून ते त्याच्या कमरेपर्यंत त्याला सर्वच ठिकाणी लागलं आहे.

हा व्हिडीओ एका महिला पोलिस अधिकाऱ्याने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ''याला शक्तीमान बनायचं होतं पण आता गंभीर दुखापतीमुळे जखमी व्यक्ती काही दिवस बसू शकणार नाही. कृपया असे धोकादायक स्टंट करू नका.'' 

लखनौच्या अतिरिक्त पोलिस उपायुक्त श्वेता श्रीवास्तव यांनी व्हिडीओ शेअर करुन लोकांना समजूतदार होण्याचे आवाहन केले आहे.