King Cobra In Blanket : थंडीचे दिवस सुरु झालेत. अशात साप किंवा नाग यांचं रक्त थंड असल्याने खासकरून थंडीमध्ये हे सरपटणारे प्राणी उबदार जागा शोधत असतात. म्हणूनच तुमच्या गाडीमध्ये, सीटखाली किंवा अगदी घरातही सध्या साप किंवा नाग घुसण्याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतं. सापांच्या विविध प्रजाती असतात. प्रत्येक प्रजाती विषारी (Venomous Snake ) जरी नसली तरीही चावला तर त्याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. साधारण अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच घडली. एक माणूस नकळत एका किंग कोबरा म्हणजेच नागासोबत ( Man Sleeps with King Cobra) झोपला. झोपल्यावर त्याला काहीतरी वेगळं, नरम लागल्याने त्याने पांघरूण काढून नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मोठा धक्काच बसला. त्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणून नाग त्याला डसला नाही.
या माणसाच्या पांघरुणामध्ये हा काळ्या रंगाचा नाग रात्रभर ( Black King Cobra) लपून बसला होता. सकाळी सहा वाजता या माणसाला जाग आली. पांघरुणात काहीतरी वेगळा स्पर्श झाल्याचं समजताच त्याने चादर चेक केली. जसा त्या माणसाने चादर हवण्याचा प्रयत्न केला, तसा त्या नागाला राग आला आणि त्याने थेट फणा उगारला. आपल्या पांघरुणात किंग कोबरा असल्याचं समजताच या माणसाच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याने थेट खोलीबाहेर पळ काढला ( man ran for his life) , याबाबतचा व्हिडीओ सोहळा मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
यानंतर या माणसाने तातडीने सर्पमित्राला फोन करून बोलावून घेतलं. सर्पमित्राने अतिशय शिताफीने त्याला पकडलं आणि घरातून बाहेर काढण्यास यशस्वी झाला. किंग कोबरा नागाचं विष हे अत्यंत घातक असतं. या विषाच्या एका थेंबाने तुमचा जीवही जाऊ शकतो. सदर घटना मध्यप्रदेशमध्ये घडल्याचं समजतंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे.