March Endingचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही आपलं हसणं थांबवू शकणार नाही.

Updated: Mar 13, 2021, 12:59 PM IST
March Endingचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू title=

मुंबई: मार्च महिन्याच्या अखेरीला सर्व कर्मचारी आपलं अप्रायझल चांगलं व्हावं यासाठी जोमानं काम करत असतात. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक मीम्सही व्हायरल झाल्याचं पाहिलं असेल. पण आता चक्क एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचं हसून हसून पोट दुखण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. 

IAS अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्वीटरवर हा व्हिडीओ मजेशीर कॅप्शन देऊन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता वादक आणि गाणारे सगळेच एकसारखे कपड्यांमध्ये एका ओळीत दिसत आहेत. सर्व कलाकार सुपरफास्ट स्पीडनं वाद्य वाजवत आहे. त्यांचं हे संगीत ऐकूण अधिकाऱ्यानं मार्चमध्ये कर्मचारी आपलं काम असं दाखवण्याचा प्रयत्न करतात असं मजेशीर कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

तर एकाने जिरा जसा तेलात घातल्यावर तडतडतो तसं या कलाकारांकडे पाहून वाटत आहे असं कॅप्शन देऊन ट्वीट शेअर केलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 48 हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 8 हजारहून अधिक लोकांनी त्याला लाईक तर दीड हजारहून अधिक लोकांनी त्याला रिट्वीट केलं आहे. युझर्सनी देखील यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Tags: