विवाहमंडळाच्या 'या' वादग्रस्त जाहिरातीनंतर वृत्तपत्रावर 'माफीनामा' छापण्याची नामुष्की

लग्न ठरवताना आजही वधू आणि वरापेक्षा त्यांच्या परिवाराचा त्यामधील समावेश अधिक असतो. 

Updated: Jul 30, 2018, 06:00 PM IST
विवाहमंडळाच्या 'या' वादग्रस्त जाहिरातीनंतर वृत्तपत्रावर 'माफीनामा' छापण्याची नामुष्की title=

मुंबई : लग्न ठरवताना आजही वधू आणि वरापेक्षा त्यांच्या परिवाराचा त्यामधील समावेश अधिक असतो. स्वभाव, आरोग्याच्या दृष्टीने एकमेकांमधील किती गुण जुळतात? हे पाहण्यापेक्षा अनेकदा जात, आर्थिक स्थेर्य, पगार, पत्रिका यांना अधिक महत्त्व दिलं जात. वर्तमानपत्रामध्येही वधू आणि वराच्या पक्षाकडून अपेक्षांची दिली जाणारी लिस्ट भली मोठी आणि विचित्र असते. लग्न ठरवताना वधू वराच्या वयात अंतर ठेवणं का गरजेचं?

बॅंगलोरमध्ये छापण्यात आली वादग्रस्त जाहिरात 

'यंग अचिव्हर्स मीट'द्वारा 12 ऑगस्टला बॅंगलोरमध्ये एक खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये अति उच्च शिक्षित, गडगंज श्रीमंत, देखण्या मुलींचा आणि इच्छित वधूवरांच्या कुटुंबाने सहभाग घ्यावा असं स्पष्ट लिहण्यात आलं होत.  

अनेक वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होताच त्यावर टीका करण्यात आली आहे. गडगंज श्रीमंतीसोबतच, इच्छित तरूण आयएएस, आयआयएमसारख्या उच्च विद्यापीठात शिक्षण घेतलेल्यांचा समावेश असावा असा उल्लेख होता. त्यामुळे माफीनामा जाहीर करत वृत्तपत्रांनी ही जाहिरात मागे घेतली आहे.  ऑनलाईन वधू वराची निवड करताना या '4' गोष्टीचं भान ठेवा

आक्षेपार्ह मजकूर  

विवाहसंस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे बाव 'यंग अचिव्हर' देण्यात आलं होत. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी किमान 5000 ते 25,000 इतके शुल्क आकारण्यात आलं होते. तसेच अचिव्हमेंट म्हणून 'ब्युटिफूल (सुंदर) मुली  असा उल्लेख करण्यात आल्याने वाद अधिक रंगला आहे. 

लोकांनी व्यक्त केली नाराजी 

 

 

 

विवाहमंडळाची जाहिरात पाहताच अनेकांनी ट्विटरवर तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारच्या लग्नसोहळ्यांवर, मुला-मुलींच्या अपेक्षांवर आणि विवाहमंडळावर टीका करण्यात आली आहे. पुरूषांसाठी लग्न करण्याचे ५ योग्य संकेत