Online Shopping Frauds: आजच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करण्याचं प्रमाण भरपूर वाढलंय. घरातल्या वस्तूंपासून तर भाजीपाल्यापर्यंत सगळ्याचं गोष्टी ऑनलाईन मिळतात. मात्र एखादी वस्तू ऑर्डर केल्यास भलतंच काहीतरी आल्याचा अनुभव तुम्हाला ही आला असेलच. ब-याचदा असं होतं की, आपण एखादी वस्तू ऑर्डर केल्यास दुस-यांचं पार्सल आपल्याला डिलिव्हर होतं किंवा अनेकवेळा ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करताना फसवणूक ही केली जाते. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन ड्रोन कॅमेरा ऑर्डर केला आणि त्याला चक्क बटाट्यांचं पार्सल मिळालं.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या नालंदामध्ये एका व्यक्तीने DJI कंपनीचा ड्रोन कॅमरा ऑर्डर केला. यूजर्सने Meesho या ऑनलाईन शॉपिंग अॅपवरून हा कॅमेरा ऑर्डर केला होता. मात्र पार्सलमध्ये त्याला चक्क बटाटे मिळाले. यासंदर्भात Meesho कंपनीने स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे.
याप्रकरणाची पडताळणी करून कारवाई करणार असल्याचं कंपनीने म्हटलंय. त्याचबरोबर युजर्सला रिफंड देण्याची देखील प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. एका व्यक्तीनं ऑनलाईन शॉपिंग साईडवरून लॅपटॉप ऑर्डर केला होता. मात्र त्याला लॅपटॉपऐवजी पार्सलमध्ये साबण आला. यावरून ऑनलाईन शॉपिंगच्या नावाने मोठ्या प्रमाणात गंडा घातला जातोय, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय.
चेतन कुमारने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. व्हिडिओत डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आल्यानंतर चेतन कुमारने त्याला पार्सल खोलण्यास सांगितलं. डिलिव्हरी बॉयने पार्सल खोलल्यानंतर त्यात बटाटे निघाले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेनंतर Meesho कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. 'यूजर फर्स्ट कंपनी, ग्राहकांचा अनुभव आमची प्राथमिकता आहे', असं कंपनीने म्हटलं आहे. ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची पूर्ण दक्षता कंपनीकडून घेतली जाईल. तसेच या प्रकरणाची चौकशी करून यावर तातडीने कारवाई केली जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
#ViralVideo: Have A Look At What A Bihar Man Recieves After Ordering Drone From Meesho.
Watch #BTTV News Reel: https://t.co/DpgC3wyHYP | #Meesho #Delivery #deliveryboy #meeshoscam #drone #potato pic.twitter.com/fvZgc4d3bq
— Business Today (@business_today) September 28, 2022
सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल सुरू आहे. सेल चालू असताना मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी सुरू असते. यादरम्यान देखील अनेकजण ऑनलाईन फ्रॉडला बळी पडतात.