भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक

भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. या वेबसाईटवर चीनी लिपीतील अक्षरं आढळली आहेत. त्यामुळे चीनी हॅकर्सने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Updated: Apr 6, 2018, 07:48 PM IST
भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक title=
Image: ANI

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. या वेबसाईटवर चीनी लिपीतील अक्षरं आढळली आहेत. त्यामुळे चीनी हॅकर्सने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

रक्षा मंत्रालय की वेबसाइट हैक होने के बाद अब गृह मंत्रालय की वेबसाइट डाउन

भारतीय संरक्षण मंत्रालयाची https://mod.gov.in ही वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारास वेबसाईट हॅक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. वेबसाईट कुणी हॅक केलीय हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये.

दरम्यान, या प्रकरणी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

संरक्षण खात्याचीच वेबसाईट हॅक झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक