मोठी दुर्घटना! बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला; 17 मजूरांचा मृत्यू

Mizoram Bridge Collapsed: मिझोराममध्ये बांधकाम सुरू असलेल्या ब्रिज कोसळला आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 23, 2023, 01:23 PM IST
मोठी दुर्घटना! बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला; 17 मजूरांचा मृत्यू title=
mizoram Bridge Collapsed Many Killed After Under Construction Railway Bridge Collapses

Mizoram Bridge Collapsed: मिझोराममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सैरांगजवळील बांधकाम सुरू असलेला रेल्वेचा पूल कोसळला आहे. यात दुर्घटनेत 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, घटनास्थळावर अन्य काही जण अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जेव्हा पूल कोसळला तेव्हा तिथे 35 ते 40 मजूर काम करत होते. आत्तापर्यंत 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरू आहे. 

आइझोलपासून 21 किमी दूर असलेल्या या पूलाचा भाग कोसळला आहे. आज सकाळी जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्याही  दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अजूनही मलब्याखाली 30 ते 40 मजूर अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी बचावपथक प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

मिझोरामच्या ज्या रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू होते. त्या पुलाची उंची 196 उंच असून 104 मीटर इतकी होती. तर, दिल्लीच्या कुतुब मिनारपेक्षाही 42 मीटर अधिक उंच होता. या पुलाच्या लोकार्पणानंतर मिझोराम देशातील विशाल रेल् नोटवर्कला जोडलं जाणार होते. 

दरम्यान, दुर्घटनेनंतर मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी दुखः व्यक्त केले आहेत. तसंच, जखमींवर लवकर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबीयांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत प्राण गामावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.