नवी दिल्ली : देशातील तीन राष्ट्रीयकृत बॅंकांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय मंत्रिमंडळाने विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदा या बॅंकांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या तीन बॅंकांची एकच बॅंक असणार आहे. त्यामुळे विलीनीकरणानंतर ही बँक देशातील तिसऱ्या क्रमांकाची बँक ठरणार आहे.
विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदा या बॅंकांच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्याचा निर्णय हा भारतीय बँकिंग क्षेत्रातील महत्वपूर्ण निर्णय आहे. सप्टेंबर महिन्यात सरकारमध्ये विलीनीकरणाबाबत निर्णय जाहीर केला होता. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Cabinet approves first-ever three way merger in Indian Banking with amalgamation of Vijaya Bank, Dena Bank and Bank of Baroda.
— ANI (@ANI) January 2, 2019
केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक बँकांचे विलीनीकरणाचे करण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार हे विलीनीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, बॅंकाच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्याही बॅंकेच्या कर्मचाऱ्याला कामावरुन कमी केले जाणार नाही, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.
सरकारी बॅंकाचे ग्रामीण भागात चांगले जाळे निर्माण व्हावे, सरकारी बँकांची वाढती थकित कर्जे, देशाच्या कानाकोपऱ्यात बँकिंग सेवा पोचवण्यासाठी असलेली मागणी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागत आहेत. बँकिंग क्षेत्राच्या योगदानाची गरज लक्षात घेऊन बॅंकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.