सीमेवर पाकिस्तानचा Drone खेळ होणार खल्लास, मोदी सरकारने तयार केला ॲक्शन प्लान

पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोनद्वारे शस्त्र पुरवठ्यावर मोदी सरकार करणार अटॅक

Updated: Jun 7, 2022, 07:28 PM IST
सीमेवर पाकिस्तानचा Drone खेळ होणार खल्लास, मोदी सरकारने तयार केला ॲक्शन प्लान title=

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सातत्याने ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा पुरवठा करण्याचा कट उधळून लावण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकार यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानला लागून असलेल्या काही भागात ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्यात आली आहे. दुसरीकडे, देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सरकार काउंटर ड्रोन तंत्रज्ञानावर काम करत आहे.

काउंटर ड्रोन तंत्रज्ञानावर उच्चस्तरीय बैठक

काउंटर ड्रोन तंत्रज्ञानाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयात या आठवड्यात मोठी बैठक झाली. या बैठकीत सर्व निमलष्करी दलांचे प्रमुख उपस्थित होते. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनवर चर्चा करण्यात आली.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत निमलष्करी दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच भविष्यात ड्रोनच्या वाढत्या धोक्याचा सामना कसा करता येईल यावरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत एनआयए, बीएसएफ, एनएसजी आणि सीआयएसएफचे डीजीही उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात ड्रोनच्या कारवाया होताना दिसत आहेत. पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनच्या मदतीने शस्त्रास्त्रे आणि स्फोटके सातत्याने भारतीय सीमेवर पोहोचवली जात आहेत. बुधवारी जम्मूमध्ये टिफिन आयडी पाठवण्याचा पाकिस्तानचा कट उधळून लावला आहे.

पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गेल्या वर्षी जूनपासून 9 पाकिस्तानी ड्रोनचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. तर यावर्षी 30 एप्रिलपर्यंत सीमेवर 53 ड्रोन दिसल्याचं वृत्त आहे. 2020 मध्ये, एकूण 79 ड्रोन पाहण्याचे अहवाल गृह मंत्रालयाला पाठवण्यात आले. तर 2021 मध्ये एकूण 109 ड्रोन दिसले आहेत.