Viral Video : अरे देवा! पाहता पाहता पाळणा 50 फुटांवरून धाssssडकन कोसळला आणि....

मन विचलित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

Updated: Sep 5, 2022, 08:53 AM IST
Viral Video : अरे देवा! पाहता पाहता पाळणा 50 फुटांवरून धाssssडकन कोसळला आणि....  title=
Mohali drop ride accident video viral

Mohali Ride Accident Viral Video : जत्रेत गेल्यानंतर अनेकांसाठीच तिथं असणारे मोठमोठाले पाळणे आकर्षणाचा विषय ठरतात. पण, हे पाळणे कायमच चांगला अनुभव देतात असं नाही. मोहालीत घडलेली घटना याचीच प्रचिती देत आहे. 

मोहालीतील एका जत्रेत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मोहालीमध्ये असणाऱ्या दसरा मैदानात जवळपास 50 फूट उंच ड्रॉप टॉवर राईड तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. (Mohali drop ride accident)

राईडवर अनेकजण होते, पण काही कळण्याच्या आतच ही घटना घडली. त्यानंतर या जत्रेत एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी या राईडवर 30 जण होते. त्यातील सर्वच जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा 13 वर असल्याचं सांगण्यात येत आहे. 

अपघातात अनेक मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Police) पोलिसांकडूनही सदर घटनेची चौकशी सुरु आहे. राईडचा मेंटेनेन्स आणि इतर तांत्रिक बाबींचं निरीक्षण केलं जात आहे. इतकं सारं सुरु असतानाच आयोजकांवर अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, यामुळं नागरिकांकडून पोलीस आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.