पोरगी परत आयुष्यात माकडाची चेष्टा करणार नाही, Video जोरदार व्हायरल!

माकडाची चेष्टा करणं आलं मुलीच्या अंगलट, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

Updated: Oct 17, 2022, 09:15 PM IST
पोरगी परत आयुष्यात माकडाची चेष्टा करणार नाही, Video जोरदार व्हायरल! title=

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ असे असतात का पाहताना तुम्हाला हसू आल्याशिवाय राहत नाही. अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी माकडासोबत चेष्टा करायला जाते. पण तिला नंतर ते चांगलंच महागात पडलं आहे. (monkeys caught hair girl social media viral video News)

व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
एक मुलगी माकडाशी मस्करी करत असताना माकड अचानक मुलीचे केस पकडतो आणि ओढायला सुरुवात करतो. मुलगी माकडाला हुसकावण्याचा प्रयत्न करते मात्र तिला काही माकड काही सोडत नाही. त्यानंतर आजूबाजूचे लोक त्या मुलीला मदत करतात. हा व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील आहे. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर आता जे लोक प्राण्यांची खोड काढतात ते विचार करूनच त्रास देतील.

माकड हा किती खोडकर प्राणी आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यात जर तुम्ही त्याची खोड काढायल जाल तर ते काही शांत बसणार नाहीत. व्हिडीओमधील मुलगीही स्वत: हून खोड काढते त्यानंतर जे झालं ते तुम्ही पाहिलंच असेल. व्हिडीओतील मुलगी परत कध माकडाची चेष्टा करेल असं काही वाटत नाही.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Md Rizwi (@mr.rizvi6)

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर 8 हजारांहून अधिक लोकांच्या लाईक्स पाहायला मिळत आहेत.