मान्सून केरळात दोन दिवसाने उशिराने, ८ रोजी येण्याची शक्यता

 मान्सून आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे.  

Updated: Jun 5, 2019, 11:15 AM IST
मान्सून केरळात दोन दिवसाने उशिराने, ८ रोजी येण्याची शक्यता title=

मुंबई : मान्सून आणखी दोन दिवसांनी लांबण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) तसा अंदाज  वर्तविला आहे. त्यामुळे केरळात दोन दिवसांनी तर महाराष्ट्र राज्यात १८ ते २० जून दरम्यान येण्याची शक्यता आहे. पुढील ९६ तासांत मान्सून केरळला पोहचण्याची शक्यता आहे. केरळमधील पावसाळा सुरू झाल्यानंतर पुढील २४ तासांत उत्तर आणि दक्षिण ओडिशातील वेगळ्या ठिकाणी वादळ येईल, असे आयएमडीचे संचालक एच.आर. विश्वास यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

दरम्यान, पुढील ४८ तासात मान्‍सून केरळच्‍या तटीय क्षेत्रात मान्‍सून हजेरी लावणार, अशी शक्‍यता वर्तवण्‍यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्‍या माहितीनुसार, बंगालच्‍या खाडीच्‍या दक्षिणेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे मान्‍सून पुढे सरकण्‍यासाठी मदत मिळेल. मान्सून पुढे सरकत राहिला आणि ही स्‍थिती कायम राहिल्यास पुढील २४ तासांमध्‍ये केरळमध्‍ये जोरदार पाऊस होण्‍याची शक्‍यता आहे. 

गोव्‍यात १२ जूनला मान्‍सून येण्‍याची शक्‍यता आहे, असे हवामान विभागाते म्‍हटले आहे. आंध्र प्रदेशच्‍या अनेक भागात मान्सून पूर्व पाऊस सुरू झाला आहे. यावर्षी मान्‍सून सहा दिवस लेट आहे. केरळमध्‍ये मान्‍सूनचा पहिला पाऊस १ जूनच्‍या आसपास सुरू होतो. तो ६ तारखेला येण्याची शक्यता होती. मात्र, आता तो दोन दिवस पुढे गेला असून तो ८ जूनला येईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. ८ जूनपासून ओडिशामध्ये जोरदार पावसासह वादळ होईल आणि जोरदार पावसाची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे.

नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयमध्‍ये जोरदार पाऊस होऊ शकतो.  तसेच जम्मू-काश्मीर, आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशात अनेक ठिकाणी; केरळ आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी आणि झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, तेलंगाना, तटीय आंध्रप्रदेश, उत्तर आंतरिक कर्नाटक आणि तमिळनाडू आणि पुडुचेरी येथेही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Tags: