Lok Sabha Monsoon session : लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेची दांडी

 Lok Sabha Monsoon session : लोकसभा अध्यक्षांनी बोलवलेल्या आजच्या बैठकीकडे शिवसेनेने पाठ फिरवली आहे.  

Updated: Jul 16, 2022, 02:45 PM IST
Lok Sabha Monsoon session : लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेची दांडी title=

मुंबई : Lok Sabha Monsoon session : लोकसभा अध्यक्षांनी बोलवलेल्या आजच्या बैठकीकडे शिवसेनेने पाठ फिरवली आहे. आज दुपारी 3 वाजता सर्वपक्षीय बैठक होत आहे. सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. 

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी बोलविलेल्या बैठकीला शिवसेना जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. लोकसभा अध्यक्षांच्या बैठकीला शिवसेनेची दांडी, याची चर्चा सुरु झाली आहे. आज सर्व पक्षीय बैठक बोलविली आहे. या बैठकीला शिवसेना गैरहजर राहणार आहे. सोमवार पासून संसदेचे अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरु होत आहे. ते 12 ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीने तशी शिफारस केली आहे. अर्थसंकप्लीय अधिवेशनात संसदीय समित्यांकडे छाननीसाठी पाठविली गेलेली 4 विधेयके आणि प्रलंबित राहिलेली अन्य विधेयके या अधिवेशनात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान, लोकसभा अधिवेशना काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची ईडीकडून झालेली चौकशी आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनाही आलेली ईडीची नोटीस यावर पावसाळी अधिवाशनात कॉंग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच वाढती महागाईबाबत संसदेत आवाज उठविण्याची शक्यता आहे. सिलिंडर गॅस दरात सातत्याने होणारी वाढ, हा विषय अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

याशिवाय महागाईबरोबरच बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती, शेतकर्‍यांच्या समस्या आदी मुद्यांवरूनही विरोधक चर्चेची मागणी करतील. महत्वाचा मुद्दा म्हणजे नव्याने असंसदीय शब्दांचा झालेला वापर, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x