फाशी दिलेल्या 'सुल्तान'चा मृतदेह पोलिसांनी कबरीतून काढला, क्रुरकर्मा डॉग ट्रेनर्सची आता खैर नाही

Sultan : एका उद्योगपतीने आपला पाकिस्तानी बुली डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवला. पण ट्रेनर त्या श्वानाला ट्रेनिंग देण्याऐवजी फासावर लटकवलं, त्यानंतर त्याचा मृतदेह जमिनीत पुरला. मध्य प्रदेशमधल्या भोपाळमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राजीव कासले | Updated: Oct 20, 2023, 07:42 PM IST
फाशी दिलेल्या 'सुल्तान'चा मृतदेह पोलिसांनी कबरीतून काढला, क्रुरकर्मा डॉग ट्रेनर्सची आता खैर नाही title=

Sultan Murder : मध्य प्रदेशमधल्या भोपाळमध्ये (Bhopal) ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्या करण्यात आलेल्या सुल्तान श्वानाचा मृतदेह पोलिसांनी कबरीतून बाहेर काढत पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टेमच्या रिपोर्टनंतर सुल्तानची (Sultan) हत्या धाली होती की नैसर्गिक मृत्यू झाला होता हे स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ट्रेनरला पोलिसांनी अटक करुन त्याला जामिनावर सोडण्यात आलं. हे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच गाजत आहे. प्राणी प्रेमींनी क्रुर ट्रेनरला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कॅम्पेनही चालवलं जात आहे. 

ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्या?
शाजापूर जिल्ह्यातील कालापीपल इथे राहाणारे उद्योगपती निखिल जायस्वाल यांनी आपला लाडका पाकिस्तान बुली डॉग सुल्तानला (Pakistani Bully Dog) भोपाळाच्या एका डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवलं होतं. पण तिथल्या ट्रेनरने सुल्तानाल ट्रेन करण्याऐवजी फाशी देऊन मारलं. यानंतर सुल्तानचा मृतदेह भोपाळमधल्या आपल्या घराच्या अंगणार पुरला. याविरोधात निखिल जायस्वाल यांनी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली. पण त्यानंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आलं. आता पुन्हा पोलिसंनी सुल्तानचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला असून मृतदेहाचा पोस्टमॉर्टेम करण्याचा निर्णय घेतलाय. 

फासावर लटकवतानाचा व्हिडिओ
सुल्तानच्या मृत्यूने निखल जायसवाल यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुल्तानला फासावर लटकवतानाच व्हिडिओ समोर असून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी निखिल जायस्वाल यांनी केली आहे. रवी कुशवाह असं या ट्रेनरचं नाव असून त्याने 4 महिन्यात सुल्तानला ट्रेन करण्याचं आश्वासन दिलं होतं. चार महिन्यांनंतर जेव्हा निखिल जायस्वावल यांनी फोन केला तेव्हा त्यांना सुल्तानचा श्वाच्छोश्वास अचानक बंद होऊन त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. 

पण जेव्हा ट्रेनिंग सेंटरमधला सीसीटीव्ही पाहिला तेव्हा ट्रेनर रवी कुशवाह, तरुण दास आणि नेहा तिवारी या तिघांनी सुल्तानला ट्रेनिंग सेंटरच्या गेटवर लटकवल्याचं समोर आलं. सुल्तान हिंसक झाल्याने त्याला गेटला बांधण्यात आलं होतं, असा दावा रवी कुशवाह याने केलाय. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मध्यप्रदेशमधले उद्योगपती निखिल जायस्वाल यांनी पन्नास हजार रुपयांना पाकिस्तानी बुली डॉग विकत घेतला होता. हा श्वान म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता. गेल्या दोन वर्षात निखिल जायस्वाल यांनी सुल्तानवर जवळपास पंधरा लाख रुपये खर्च केले होते. सुल्तानचा दिवसाचा खुराक हा 3 ते 4 हजार रुपये इतका होता. 

सुल्तानला अगदी शाही सुविधा दिल्या जात होत्या. 1200 रुपये किलो किमतीची चिकन ग्रेव्ही त्याला जेवणात दिली जात होती. याशिवाय त्याच्या शरीरावर 560 रुपयांचा महागडा स्प्रे फवारला जायचा. त्याच्यासाठी खास 850 रुपये किंमतीचं परम्यून आणि आंघोळीसाठी महागडा शॅम्प्यू वापरला जायचा. 

सुल्तानला दररोज ताजं मटण दिलं जायचं. सुल्तान इतका शक्तीशाली होता की बोलेरो कार तो ओढत न्यायचा. पाकिस्तान बुली डॉग हे पहाडी परिसरात आढळतात. यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची धिप्पाड शरीरयष्टी असते. पण इतर श्वानांपेक्षा पाकिस्तानी बुली डॉग हे जास्त आक्रमक असतात. त्यामुळे त्यांना घराऐवजी अनेकजण फार्म हाऊसमध्ये पाळतात.