Youtube N0 1 Channel MrBeast: युट्यूबच्या जगतात एका 26 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला आहे. या मुलाने भारताच्या म्युझिक कंपनीला फॉलोअर्स व सबस्क्रायबर्समध्ये मागे टाकलं आहे. युट्यूबवर सगळ्यात जास्त सब्सक्राइबर्स T-Series चे होते. मात्र, आज टी-सीरीजला मागे टाकत MrBeast ने नवीन रेकॉर्ड रचला आहे. सोशल मीडियावरदेखील या MrBeastचा बोलबाला आहे.
युट्यबची सुरुवात 2005मध्ये झाली होती. या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यामुळं प्रेक्षकांचे मनोरंजन तर होतेच पण लोक लाखो-कोटी रुपयांपर्यंत कमाईदेखील करतात. युट्युबवर व्हिडिओबरोबरच आता लोक शोर्ट्स म्हणजेच शॉर्ट व्हिडिओदेखील अपलोड करत आहेत. मात्र, आता सब्सक्राइबर्सच्या शर्यतीत MrBeast ने पहिला नंबर पटकावला आहे.
MrBeast हे एक युट्यूब चॅनल आहे आणि ज्याचे हे युट्यूब चॅनेल आहे त्याचे वय फक्त 26 वर्षे असून त्याचे नाव जिम्मी डोनाल्डसन आहे. युट्यूबवर नंबर 1चा क्रमांक पटकावल्यानंतर डोनाल्डसन खूप जास्त आनंदी आहे. त्याने त्याच्या एक्स अकाउंटवर (ट्विटर) वर स्वतःच ही गुड न्यूज शेअर केली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये टी-सीरीज आणि MrBeast दोघांच्या युट्यूब सब्सक्राइबर्स कंपेअर केले आहेत. ज्यात तुम्ही पाहू शकता की, MrBeastचे फॉलोवर्स टी-सीरीजच्या तुलनेत जास्त आहेत. एक्सवर डोनाल्डसनने लिहले आहे की, 6 वर्षांनंतर अखेर आम्ही प्युडीपायचा बदला घेतलाच.
After 6 years we have finally avenged Pewdiepie pic.twitter.com/V1znbyqw27
— MrBeast (@MrBeast) June 2, 2024
जिम्मी डोनाल्डसन यांने त्याच्या एक्स पोस्टमध्ये प्युडीपायचा उल्लेख केला आहे. हे प्युडीपाय म्हणजे काय, त्याबद्दल जाणून घेऊया. प्युडीपायदेखील एक युट्यूब चॅनेल आहे. सध्या या युट्यूब चॅनेलचे 111 मिलियन सब्सक्रायबर्स आहेत. टी-सीरीज Pewdiepie ला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला होता. मात्र, आता MrBeastने टी-सीरीजचा हा नंबर पटकावला आहे.
जिम्मी डोनाल्डसनच्या MrBeast या युट्यूब चॅनेल आता नंबर एक ठरले आहे. MrBeastच्या युट्यूबवर आता 267 मिलियन म्हणजेच 26 कोटीहून अधिक सब्सक्राइबर्स झाले आहेत. MrBeast चॅनेलवर आत्तापर्यंत एकूण 798 व्हिडिओ अपलोड झाले आहेत. तर, दुसरीकडे टी-सीरिजचे 266 मिलियन सब्सक्रायबर्स आहेत. टी सीरीज आता दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहे. टीसीरीज ही भारतातील सर्वात लोकप्रिय म्युझिक व्हिडिओ कंपनी आहे. यावर आत्तापर्यंत 21 हजारहून अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.