Coronavirus चे एकूण किती व्हेरीयन्ट भारतात एक्टिव्ह आहे? कोणता व्हेरीयन्ट किती घातक

भारतातील कोरोना व्हायरसचे रुग्ण खूप झपाट्याने वाढत आहेत. त्यासाठी 'डबल म्युटंट व्हायरस'ला (Double Mutant Virus) दोष देण्यात येत आहे. 

Updated: Apr 22, 2021, 03:18 PM IST
Coronavirus चे एकूण किती व्हेरीयन्ट भारतात एक्टिव्ह आहे? कोणता व्हेरीयन्ट किती घातक title=

मुंबई : भारतातील कोरोना व्हायरसचे रुग्ण खूप झपाट्याने वाढत आहेत. त्यासाठी 'डबल म्युटंट व्हायरस'ला (Double Mutant Virus) दोष देण्यात येत आहे.  ज्यामुळे जास्त संक्रामक होते. कोरोना विषाणू सतत बदलत असतो आणि याच आधारे असे म्हटले जात आहे की, देशात अनेक प्रकारचे कोरोना विषाणू कार्यरत आहेत. आपण जाणून घेऊयात की, कोणत्या प्रकारांचे कोरोना विषाणू भारतात आढळले आहेत आणि ते किती धोकादायक आहेत.

यूके व्हेरीयन्ट - B.1.1.7

ब्रिटिश कोरोना प्रकार, जो B.1.1.7 म्हणून ओळखला जातो. वैज्ञानिकांच्या मते, हा विषाणू सर्व जुन्या कोरोना विषाणूच्या प्रकारांपेक्षा 40 ते 70 टक्के वेगाने पसरतो. याव्यतिरिक्त, या विषाणूच्या संसर्गाने मृत्यूची शक्यता 60 टक्क्यांनी वाढते. ब्रिटनमध्ये प्रथमच आढळलेल्या या विषाणूच्या जेनेटिकमध्ये 23 म्यूटेशन आढळतात.

ब्राझिलियन व्हेरियन्ट - P1

ब्राझीलपासून सुरू झालेल्या P1 व्हेरियंटमध्ये, कोरोना व्हायरसपासून बऱ्या झालेल्या रुगणाला तो पुन्हा होऊ शकतो. हा प्रकार अत्यंत संक्रामक धोकादायक आहे. यावर अद्याप संशोधन सुरू आहे. E484K म्यूटेशनसह हा व्हायरस ब्राझिलियन प्रकारामुळे अमेरिकेसह युरोपमधील इतरही काही देशांमध्ये संसर्ग झाला आहे.

दक्षिण आफ्रिका व्हेरियन्ट - B.1.351

दक्षिण आफ्रिकेतून सुरु झालेला हा स्ट्रेन  जास्त वेगाने पसरतो. E484K म्यूटेशनसह तो N501Y म्यूटेशनला देखील त्यामध्ये आहे. हा स्ट्रेन ब्रिटनसह अनखी 20 देशांपर्यंत पोहोचला आहे.

भारतीय प्रकार - B.1.617

भारताच्या या नवीन स्ट्रेनला वैज्ञानिकदृष्ट्या B.1.617 असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये दोन प्रकारचे म्यूटेशन (E484Q आणि L452R) आहेत.  E484Q आणि L452R च्या मिश्रणाने भारतात पसरलेला हा दुहेरी म्यूटेशन विषाणू जास्त धोकादायक आहे. आम्हाला कळू द्या की L452R हा स्ट्रेन अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये आढळते, तर E484Q हा स्ट्रेन भारतीय आहे. हा प्रकार अधिक संसर्गजन्य आहे आणि वेगाने पसरतो.