मुंबई : भारतात अनेक ठिकाणी मंदिरं आहेत. आपल्या देशात अशी अनेक मंदिरं आहेत, जी रहस्यांनी भरलेली आहेत. अनेक मंदिरांमध्येही भाविकांना चमत्कार पाहायला मिळतात. लवकरच भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी येणार आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाच्या अशाच एका मंदिराविषयी सांगणार आहोत, जे रहस्यांनी भरलेलं आहे.
या मंदिरामध्ये रोज सकाळी आश्चर्यकारक चमत्कार पाहायला मिळतात. हे रहस्यमय मंदिर उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये आहे. मथुरेतील वृंदावनमध्ये असलेलं हे मंदिर निधिवनमध्ये आहे.
निधिवनमध्ये असलेल्या या रहस्यमय मंदिराविषयी असं म्हटलं जातं की, भगवान श्रीकृष्ण याठिकाणी दररोज झोपण्यासाठी येतात. विशेष म्हणजे या मंदिरात देवाच्या झोपण्यासाठी मंदिराचं दरवाजे आपोआप उघडतात आणि बंद होतात. अनेकांनी त्याचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण आजपर्यंत कोणालाही त्यात यश आलेलं नाही.
वृंदावनच्या निधीवनात असलेलं हे भगवान श्रीकृष्णाचं मंदिर अतिशय चमत्कारिक आहे. या मंदिराबद्दल अनेक प्रसिद्ध कथा आहेत. असं म्हटलं जातं की, या मंदिरात दररोज परमेश्वराच्या झोपेसाठी पलंग तयार केला जातो. दररोज संध्याकाळी मंदिर प्रशासनाच्या वतीने दरवाजे बंद करण्यापूर्वी स्वच्छ गाद्या आणि चादरी अंथरूण म्हणून घातल्या जातात. सकाळी मंदिर उघडलं की, अंथरूणावर घड्या असतात जणू या पलंगावर कुणीतरी झोपलं होतं.
मंदिरात आणखी एक चमत्कार पाहायला मिळतो. या मंदिरात भाविकांना लोणी आणि साखरेचा प्रसाद दिला जातो. त्याचबरोबर जो प्रसाद शिल्लक राहतो तो मंदिरातच ठेवला जातो, पण हा प्रसाद सकाळपर्यंत आपोआप संपतो. असं मानलं जातें की, हा प्रसाद स्वतः भगवान श्रीकृष्ण खातात.