जम्मू-काश्मीर: पाकिस्तानी सैन्याने रविवारी सीमारेषेवर केलेल्या गोळीबारात नाशिकचे सुपूत्र केशव सोमगीर गोसावी हे शहीद झाले आहेत. येथील नौशेरा सेक्टरमध्ये दुपारी पावणेतीनच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार सुरु केला.
या गोळीबारात केशव गोसावी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. मात्र, त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.
शहीद केशव गोसावी हे २९ वर्षांचे असून ते नाशिकच्या श्रीरामपूर गावातील रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात परिवारात पत्नी यशोदा गोसावी या आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
Naik Gosavi Keshav Somgir, an Army soldier lost his life in a ceasefire violation by Pakistan along the Line of Control (LoC) in Nowshera Sector, earlier today. pic.twitter.com/HwkpZ59epK
— ANI (@ANI) November 11, 2018