प्रसिद्ध साहित्यकार नामवर सिंह यांचे निधन

वयाच्या ९२व्या वर्षी दिल्लीतील एम्स रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास.

Updated: Feb 20, 2019, 10:16 AM IST
प्रसिद्ध साहित्यकार नामवर सिंह यांचे निधन title=

मुंबई : हिंदीचे प्रसिद्ध साहित्यकार नामवर सिंह यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यांपासून त्यांची तब्येत खराब होती. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज दिल्लीतील एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

नामवर सिंह हिंदीचे प्रसिद्ध साहित्यकार होते. त्यांनी हिंदी साहित्याला एका वेगळ्याच उंचीवर नेून ठेवले होते. त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे १९७१ साली त्यांना साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २० जुलै १९२७ रोजी वाराणसीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी काशी विद्यापिठातून एमए आणि पीएचडी केली आहे. त्यानंतर अनेक वर्ष त्यांनी प्रोफेसर म्हणून नोकरी केली. नामवर सिंह यांनी देशातील अनेक प्रतिष्ठित विद्यापिठात शिकवले आहे. जोधपूर, आगरा, जेएनयू विद्यापिठात ते प्राध्यापक होते. दिल्लीच्या जेएनयू विद्यापिठातून ते निवृत्त झाले होते.

नामवर यांनी लिहिलेली 'छायावाद', 'नामवर सिंह और समीक्षा', 'आलोचना और विचारधारा' ही पुस्तके आजही चर्चेचा विषय आहेत. लेखन आणि प्राध्यापक याव्यतिरिक्त त्यांचा राजकारणातही सक्रिय सहभाग होता. उत्तर प्रदेशातील भारतीय  कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांनी लोकसभा निवडणूकी लढवली होती. परंतु या निवडणूकीत त्यांना हार पत्करावी लागली होती.