नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी केंद्र सरकारतर्फे महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. भविष्यातील संभ्याव्य धोका लक्षात घेता तशा उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र मिळून यावर मार्ग काढत आहेत. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारने मोठं पॅकेज जाहीर केलंय.
केंद्र सरकारने इंडिया कोविड १९ एमर्जंसी रिस्पॉन्स एंड हेल्थ सिस्टिम पीपेयर्डनेस पॅकेज जारी केल्या संदर्भातील माहिती राज्यांना कळविण्यात आली आहे. हा प्रोजक्ट पूर्णपणे केंद्र सरकारतर्फे असणार आहे. तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे लागू केलं जाईल. जानेवारी २०२० पासून मार्च २०२४ दरम्यान हे तीन टप्पे असतील. कोविड १९ एमर्जंसी रिस्पॉन्स अंतर्गत राज्यातील आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात मजबूत करण्यात येतील.
टप्पा १ : जानेवारी २०२० ते जून २०२०
टप्पा २ : जुलै २०२० ते मार्च २०२१
टप्पा ३ : एप्रिल २०२१ ते मार्च २०२४
केंद्र सरकार राज्यांना मुलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हे पॅकेज देत आहे. जानेवारी २०२० पासून मार्च २०२४ पर्यंत हा प्रकल्प तीन टप्प्यांत विभागला आहे. या दरम्यान केंद्रातर्फे राज्यांना पैसे मिळतील. पहिल्या टप्प्यातील रक्कम राज्यांना पाठविण्यात आली आहे.
या पैशांचा उपयोग कोविड रुग्णालय, आयसोलेशन वॉर्ड, आयसीयू, वेंटीलेटर्स, ऑक्सिजन पुरवठा, लॅब, पीपीई, मास्क, आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती या कामासाठी होणार आहे.