'राफेल विमान खरेदी प्रकरणात थेट नरेंद्र मोदींचा सहभाग'

राफेल विमान खरेदी प्रकरणात थेट मोदींचा सहभाग आहे. सात-आठ वर्षांची प्रक्रीया पंतप्रधानांनी दोन दिवसांत बदलल्याचा आरोप करण्यात आलाय.

Updated: Sep 12, 2018, 11:27 PM IST
'राफेल विमान खरेदी प्रकरणात थेट नरेंद्र मोदींचा सहभाग'

नवी दिल्ली : फ्रान्ससोबतच्या राफेल विमान खरेदी प्रकरणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरींनी पत्रकार परिषदेत केलाय. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला. गेल्या सात-आठ वर्षांपासून सुरू असलेली प्रक्रिया पंतप्रधानांनी दोन दिवसांत बदलल्याचा आरोप शौरींनी केलाय. 

गेल्या सात आठ वर्षांपासून सुरू असलेली प्रक्रिया पंतप्रधानांनी दोन दिवसांत उलटी केली. डिफेन्स प्रोक्युरमेंट पॉलिसी आणि गाईडलाईन्सनुसार त्यांना हे करण्याचा अधिकारच नव्हता. मुळात या करारात गोपनियतेचा मुद्दाच नव्हता. तोदेखील यांनीच आणला, असा हल्लाबोल शौरी यांनी केलाय.