अरबी समुद्रात नौदलाचे रेस्क्यू ऑपरेशन, 200 हून अधिक जणांची सूटका

नौदलाचं कठीण परिस्थितीत बचावकार्य

Updated: May 18, 2021, 09:38 PM IST
अरबी समुद्रात नौदलाचे रेस्क्यू ऑपरेशन, 200 हून अधिक जणांची सूटका

मुंबई : नौदलाच्या आयएनएस कोची, कोलकता, बियास, बेतवा आणि तेग या युद्धनौकांनी समुद्रात 64 किलोमीटर अंतरावर बार्ज P-305 मधून 180 जणांची आत्तापर्यंत सुटका केली आहे. सोबतीला P-8i हे विमान होते. बार्ज P-3 मधल्या 180 लोकांची सुटका केली आहे असून अजूनही 93 जण समुद्रात आहेत. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न रात्रीही सुरू रहाणार असल्याचं नौदलाने स्पष्ट केलं आहे. 

दुसऱ्या एका मोहिमेत GAL constructor मधून हेलिकॉप्टरने 137 जणांची सुटका करण्यात आली आहे, तर गुजरातजवळ आयएनएस तलवारने अशाच शोध सुटका मोहिमेत मदत केली आहे.

Cyclone Tauktae मुळे मोठं नुकसान झालं आहे. बार्ज P305 मंगळवारी बुडालं. या जहाजावर 177 लोकं होतं. भारतीय नौदलाने 74 क्रू मेंबर्सचा शोध सुरु केला आहे. नौदल मदतकार्यात गुंतलं आहे.

आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता देखील या कामात लावली गेली आहे.