हायकोर्टाने लिव्ह इन रिलेशनशीप नाकारलं, पाहा कोर्टाने काय म्हटलंय...

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या चुकीचे आहे आणि ते स्वीकारले जाऊ शकत नाही.

Updated: May 18, 2021, 08:28 PM IST
हायकोर्टाने लिव्ह इन रिलेशनशीप नाकारलं, पाहा कोर्टाने काय म्हटलंय... title=

हरियाणा : पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने एक महत्वाच्या गोष्टीवर आपला निर्णय दिला आहे. या निर्णयामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या चुकीचे आहे आणि ते स्वीकारले जाऊ शकत नाही. हायकोर्टाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान हे सांगितले आहे. खरंतर, एका 19 वर्षाची मुलगी आणि एक 22 वर्षांच्या मुलाने पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत मुलीच्या कुटुंबीयांकडून आपल्याला धोका असल्याचे सांगून पंजाब पोलिसांकडून संरक्षणाची मागणी केली होती.

हायकोर्टाने हे सांगितले

या याचिकेवर सुनावणी देताना न्यायमूर्ती एचएस मदन यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की "याचिकाकर्त्यांना या याचिकेच्या बहाण्याने त्यांचे लाइव्ह इन रिलेशनशिप पक्कं करायचे आहे़. परंतु ते नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या मान्य नाही. त्यामुळे याचिकेवर कोणतेही आदेश देऊ शकत नाही. ही याचिका न्यायालयाने डिसमिस केली आहे."

याचिकाकर्त्यांचे वकील जे.एस. ठाकूर यांचे म्हणणे आहे की, मुलगा आणि मुलगी गेल्या 4 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत. मुलीच्या कुटुंबातील सदस्य या नात्याच्या विरूद्ध आहेत. वकील जे.एस. ठाकूर यांचे म्हणणे आहे की, मुलीच्या वयाशी संबंधित कागदपत्रे तिच्या कुटुंबीयांकडे आहेत, ज्यामुळे अद्याप दोघांचेही लग्न झाले नाही.

आता मुलीच्या घरातील सदस्यांकडून दोघांचाही जीव धोक्यात आला आहे. म्हणूनच दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु हायकोर्टाने त्यांना पाठींबा देण्यास नकार दिला आहे.