राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी

गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 18, 2017, 10:20 AM IST
 राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी title=

जामनगर : गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.

साबरकांठा लोकसभा मतदार संघातील मोडसा या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे.  कंधालभाई सरमानभाई जडेजा यांनी आघाडी घेतली आहे. 

गुजरातमध्ये हा सर्वात वेगळा निकाल आपल्याला पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि भाजपच्या लढाईत राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे.