ठरलं! निर्भयाच्या दोषींना २० मार्चला फासावर लटकवणार

अखेर निर्भयाला मिळणार न्याय 

Updated: Mar 5, 2020, 03:10 PM IST
ठरलं! निर्भयाच्या दोषींना २० मार्चला फासावर लटकवणार title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील मुख्य आरोपींना अखेर फाशी निश्चित झाली आहे. 20 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता चौघांना फाशी देण्यात येणार आहे. दिल्ली कोर्टाकडून चारही आरोपींच डेथ वॉरंट जाहीर करण्यात आलं आहे. अखेर चारही आरोपींची फाशी निश्चित झाली आहे. 

पवन गुप्ता, मुकेश सिंह, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर अशी चारही आरोपींची नावे आहे. या चौघांना 20 मार्च रोजी शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता फाशी देण्यात येणार आहे.  पवन कुमारची दया याचिका फेटाळल्यानंतर हा निर्णय आज घेण्यात आला आहे. अखेर निर्भयाला न्याय मिळणार आहे. निर्भयाची आई गेल्या कित्येक दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होती. 2012 मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं, 

 निर्भयाच्या चारही दोषींना अखेर २० मार्चला फाशी देण्यात येणार आहे. दिल्ली कोर्टानं या सर्वांचं डेथ वॉरंट काढलंय. २० मार्चला पहाटे साडे पाच वाजता निर्भयाच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यात येणार आहे. पवन कुमारची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यामुळे या चौघांना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता या सर्वांचे फाशी पुढे ढकलण्याचे सर्व कायदेशीर मार्ग संपले आहेत. त्यामुळे आता सर्वांना २० मार्चला फाशी शिक्षा देण्यात कोणताही अडथळा नाही.