निर्भयाच्या दोषींना १ फेब्रुवारीला फाशी

दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना १ फेब्रुवारीला फाशी देण्यात आली आहे.

Updated: Jan 17, 2020, 05:28 PM IST
निर्भयाच्या दोषींना १ फेब्रुवारीला फाशी

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना १ फेब्रुवारीला फाशी देण्यात आली आहे. सकाळी ६ वाजता या दोषींना फासावर लटकवलं जाणार आहे. निर्भयाच्या आईने यावर संताप व्यक्त केला आहे. आरोपींच्या फाशीवर तारीख पे तारीख मिळत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली आहे. निर्भयाच्या दोषींचा डेथ वॉरंट जारी करण्यात आला आहे.

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी असलेल्या मुकेशची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली होती. राष्ट्रपतींनी देखील दोषी मुकेशची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची शिफारस केली आहे. गृह मंत्रालयाकडून ही याचिका राष्ट्रपती यांना पाठवली जाते. गृह मंत्रालयाने मुकेशची दया याचिका पाठवताना त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याबाबत राष्ट्रपतींकडे विनंती केली होती. 

निर्भया प्रकरणातील इतर ३ आरोपींनी अजून दया याचिका केलेली नाही.