60 वर्षात झाले नाही ते साडे चार वर्षात झाले- गडकरी

नोटबंदीमुळे दहशतवाद थांबण्यास मदत झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Updated: Jan 12, 2019, 12:48 PM IST
60 वर्षात झाले नाही ते साडे चार वर्षात झाले- गडकरी  title=

नवी दिल्ली : 60 वर्षात नाही झाले ते साडे चार वर्षात झाले असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.  नवी दिल्लीत सुरू झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप होत आहे. समारोपाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान मोदी काय बोलणार याची उत्सुकता आहे. पहिल्या दिवशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस आणि राहुल गांधींवर तुफानी हल्लाबोल चढवला. आगामी लोकसभा निवडणुका हा विचारसरणींचा संघर्ष असल्याचं शाह म्हणाले. नीरव मोदी, मल्ल्या पळून गेले कारण चौकीदार पंतप्रधानपदी आहे. काँग्रेसच्या राजवटीत भ्रष्टाचाऱ्यांना मोकळं रान होतं, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. 

सवर्णांना 10 टक्के आरक्षण देऊन भारताच्या इतिहासात सामाजिक न्यायाला योग्य मार्ग दिलाय. दलित, पीडित, वंचितांना आपण न्याय दिला आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण विकासाचे राजकारण करत आहोत. गरीबी, भुकमारी हटवून सुखी, समृद्धी राज्याच्या दिशेने आपण अग्रेसर आहोत. मुस्लिम महिलांना भाजप सरकारने न्याय मिळवून दिल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. नोटबंदीमुळे दहशतवाद थांबण्यास मदत झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.गरीबी हटली पण ते गरीबांची नाही तर कॉंग्रेसच्या चमच्यांची गरीबी हटली असा टोलाही त्यांनी कॉंग्रेसला लगावला. देशातील 7 कोटीहुन जास्त गरीबांना आमच्या योजनांमुळे थेट फायदा मिळाला आहे.