नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 56 हजाराच्या पार गेली आहे. मागीली 24 तासाच देशात कोरोनाचे 3390 नवीन रुग्ण वाढले आहेत. तर 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 1273 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील 216 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. देशात कोरोनाच्या रुग्णांचा रिकवरी रेट आता 29.36% झाला आहे. आरोग्य मंत्रलायाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
अग्रवाल यांनी म्हटलं की, "देशात 42 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. देशातील 46 जिल्ह्यांमध्ये गेल्या 7 दिवसात कोरोनाचा कोणताच रुग्ण आढळला नाही. 29 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 दिवसात तर 36 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही रुग्ण आढळलेला नाही.
लव अग्रवाल यांनी म्हटलं की, "रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण देखील वाढले आहे. प्रत्येक तीन दिवसात एक रुग्ण बरा होत आहे. आतापर्यंत 16,540 रुग्ण बरे झाले आहेत. तर 37,916 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1886 लोकांचा मृत्यू झाला आहे."