शपथविधी सोहळ्याचं नरेंद्र मोदींच्या कुटुंबियांना आमंत्रण नाही

नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

Updated: May 30, 2019, 05:58 PM IST
शपथविधी सोहळ्याचं नरेंद्र मोदींच्या कुटुंबियांना आमंत्रण नाही title=

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या या शपथविधी सोहळ्याला देश-विदेशातील ६००० लोकं उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बॉलिवूडचे अनेक कलाकार देखील या शपथविधीला येणार आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे या सोहळ्याला मोदींच्या कुटुंबियांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. नरेंद्र मोदींच्या कुटुंबातून कोणीही या सोहळ्य़ाला उपस्थित राहणार नाही.

नरेंद्र मोदी यांची बहिण वसंतीबेन यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला आमच्या कुटुंबातून कोणाला ही आमंत्रण मिळालेलं नाही. २०१४ मध्ये ही आम्हाला आमंत्रण दिलं गेलं नव्हतं. प्रत्येक बहिण भावाला राखी पाठवते. बहिणीला नेहमी वाटतं की, आपल्या भावाने पुढे जावं. एका गरीब घरातील मुलगा पुढे जात आहे. जनतेने देखील त्यांना साथ दिली. मी जनतेची आभारी आहे.'

'जेव्हा नरेंद्र मोदी वडनगरला आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली होती. मी त्यांना राखी देखील बांधली होती. आम्हाला आमंत्रण सोहळ्याचं आमंत्रण नाही. कारण नरेंद्र मोदींचं जीवन हे देशाला समर्पित आहे.'

नरेंद्र मोदींचे भाऊ प्रह्लाद मोदी यांनी म्हटलं की, लोकांनी जो नरेंद्र भाईवर विश्वास ठेवला, इतका मोठा विजय मिळवून दिला. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे.'

संध्याकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात हा भव्य सोहळा होत आहे. ९० मिनिटं हा सोहळा चालणार आहे. अनेक मोठे नेते, देशाचे प्रमुख, कलाकार आणि कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.