मुंबई : जर तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला या बातमीने धक्का बसू शकतो. कारण कंपन्या खर्च कमी करण्यासाठी आणि ऑटोमेशन सारखे नवीन तंत्रज्ञान येत असल्याने पर्मनन्ट जॉब्स हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहेत.
केलीओसीजीने वर्कफोर्स एजिलीटी बेरोमिटर स्टडीमध्ये खुलासा केला आहे की, आता केवळ भारतात 56 टक्के कंपन्यामध्ये 20 टक्के वर्कफोर्स कामाच्या वेळेच्या मर्यादेवर नियुक्त आहेत. 71 टक्के कंपन्या अशा प्रकारच्या नियुक्त्या पुढच्या २ वर्षात करणार आहेत. यामध्ये सर्वात जास्त आशिया खंडातील कंपन्यांचा समावेश आहे.
आयटी, शेअर्ड सेवा केंद्र आणि स्टार्टअप्समध्ये सर्वात जास्त नोकऱ्या या कामकाजाच्या वेळेच्या मर्यादेवर दिल्या जात आहेत. या आधारे नेमलेल्या लोकांमधये फ्रीलांसर्स, टेंपररी स्टाफ, सर्व्हिस प्रोवाइडर्स, अलॉम्नी, कन्सल्टन्ट्स आणि ऑनलाइन टॅलेन्ट कम्यूनिटिज अशा लोकांचा समावेश आहे.
या मॉडेलला गिग इकॉनमीचे नाव देण्यात आले आहे. कारण कंपन्या परमनन्ट ऐवजी तात्पुरत्या किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसीसवर नोकऱ्या देत आहेत. या गिग इकॉनमीमध्ये अनेक लोकं मागणी आणि पसंतीनुसार वेगवेगळ्या प्रकल्प आणि संस्थांमध्ये डिमांड-सप्लाय मॉडेलवर काम करतात. ज्यामध्ये ते खूप कमी वेळात नोकऱ्या बदलतात.
जसे-जसे कामाचा भाग बदलत आहे. तसे तसे नोकऱ्याच्या संधी देखील बदलत आहेत. पुढील दहा वर्षांमध्ये जॉब मिळवणे आणि काम करणे या दोन्ही प्रकारचे मार्ग बदलणार आहेत. नवीन तरुणांसाठी नोकरीच्या संधी खूप असल्या तरी नोकरीमध्ये निश्चितता कमी झाली आहे. जॉब रिस्क वाढला आहे.